Sanjay Raut | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांचा एक फोटो ट्विट केल्याने राज्याच्या राज्यकारणात खळबळ उडाली आहे.
या पोस्टच्या माध्यमातून संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी बावनकुळे कॅसिनो खेळत असल्याचा दावा केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी साडेतीन कोटी रुपये उडवले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत ( Sanjay Raut ) यांचे हे आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळले आहे. अशात त्याच वेळी भारतीय जनता पक्षाने आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांचा एक फोटो ट्विट करून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला.
याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हातात सीबीआय आणि ईडी आहे, म्हणून भाजपची मर्दानगी जागी असल्याचं संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी म्हटलं आहे.
How many photos of Modi should I show? – Sanjay Raut
आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले, “आदित्य ठाकरे यांच्या हातात असलेला ग्लास आहे की डायट कोकचं टिन आहे, ते एकदा नीट चेक करा.
अशा प्रकारचे मी मोदींचे किती फोटो दाखवू? पंतप्रधान नरेंद्र मोदी जे पीत होते, तेच आदित्य ठाकरे देखील पीत होते. तो डायट कोक आहे आणि हे स्पष्टपणे दिसत आहे.
परंतु, सध्या भारतीय जनता पक्ष एवढा घाबरला आहे की त्यांना भान राहिले नाही की ते आदित्य ठाकरे यांचा कोणता फोटो पोस्ट करत आहे.
तो अत्यंत डरपोक पक्ष आहे. त्यांच्या हातात ईडी, सीबीआय आणि पोलीस आहे, म्हणून त्यांच्यातली मर्दानगी जागी आहे. यांच्याकडे जर पोलीस आणि या दोन एजन्सी नसतील तर यांच्यासारखे डरपोक लोक कोणी नाही आणि हे लोक मला धमक्या देत आहेत. यांनी एकदा समोर यायला हवं. त्यांनी उगाच तोंडपाटीलक्या करू नये.”
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal | मी इतर लोकांप्रमाणे गाव बंदी वगैरे काही केलेली नाही; भुजबळांनी पुन्हा एकदा जरांगेंना डिवचलं
- Uddhav Thackeray | ‘मोदी’ स्टेडियमवर अपयश आले म्हणून टीम इंडियाने खचून जाऊ नये; ठाकरे गटाची टीका
- Methi Benefits | बदलत्या वातावरणात मेथीचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात अनेक फायदे
- Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? 24 तारखेला होणार नियमित सुनावणी
- Sanjay Raut | आमच्याकडे मकाऊमध्ये सीबीआय आणि ईडी आहे; बावनकुळे कॅसिनो प्रकरणावरून राऊतांचा भाजपला इशारा