Sanjay Raut | आमच्याकडे मकाऊमध्ये सीबीआय आणि ईडी आहे; बावनकुळे कॅसिनो प्रकरणावरून राऊतांचा भाजपला इशारा

Sanjay Raut | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांना त्यांच्या मकाऊ दौऱ्यावरून धरलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे आपल्या संपूर्ण परिवारासह मकाऊ गेलेले आहे. अशात संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी त्यांच्या या दौऱ्याचा एक फोटो ट्विटर पोस्ट करत ते कॅसिनो खेळत असल्याचा दावा केला आहे.

माझ्याकडे या माणसाचे 27 फोटो आणि काही व्हिडिओ आहेत. त्यामुळे या मुद्द्यावर तुम्ही जेवढे खोटं बोलाल तेवढे अजून उघडे पडाल, अस संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी म्हटलं आहे. संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

I have 27 photos – Sanjay Raut 

संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले, “त्या फोटोमध्ये महाराष्ट्रातील नेता दिसत आहे. यामध्ये मी कोणत्याही व्यक्तीचं नाव घेतलेलं नाही. मकाऊमध्ये एक माणूस साडेतीन कोटी रुपये उडवतो, म्हणजे खऱ्या अर्थानं अच्छे दिल आलेत.

माझ्याकडे या माणसाचे 27 फोटो आणि काही व्हिडिओ आहेत. त्यामुळे या मुद्द्यावर तुम्ही जेवढे खोटं बोलाल तेवढे अजून उघडे पडाल.

भारतामध्ये तुमच्याकडे ईडी आणि सीबीआय आहे. मात्र, आमच्याकडे मकाऊमध्ये सीबीआय आणि ईडी आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. त्याचबरोबर राज्यात दुष्काळ परिस्थिती असताना हे सहकुटुंब गेलेले आहेत.”

दरम्यान, या प्रकरणावर नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “राज्यामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली असताना संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कॅसिनो खेळतानाचा फोटो ट्विट केला आहे.

या फोटोची चौकशी व्हायला हवी. त्याचबरोबर वेळ आली तर यामध्ये सीबीआय चौकशी देखील झाली पाहिजे”, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.