Share

Devendra Fadnavis | चंद्रशेखर बावनकुळे मकाऊला जाऊन कॅसिनो खेळले? देवेंद्र फडणवीस म्हणतात…

Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) सहकुटुंब मकाऊला गेले आहेत. अशात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोच्या माध्यमातून संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे कॅसिनो खेळत असल्याचा दावा केला आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस … Read more

Published On: 

Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) सहकुटुंब मकाऊला गेले आहेत.

अशात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोच्या माध्यमातून संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे कॅसिनो खेळत असल्याचा दावा केला आहे.

याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी जाणीवपूर्वक अर्धा फोटो ट्विट केला आहे, असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटल आहे.

Sanjay Raut has deliberately tweeted half of the photo – Devendra Fadnavis 

प्रसार माध्यमांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले, “या पोस्टच्या माध्यमातून संजय राऊत यांची विकृत मानसिकता झळकत आहे. ते किती डेस्परेट झाले आहे, हे यातून लक्षात येत आहे.

चंद्रशेखर बावनकुळे सहकुटुंब त्या हॉटेलमध्ये थांबलेले होते. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्या ठिकाणी त्या हॉटेलमध्ये जेवण केलं त्याच्या बाजूला कॅसिनो आहे.

संजय राऊत यांनी जाणीवपूर्वक अर्धा फोटो ट्विट केला आहे. त्यांनी जर पूर्ण फोटो ट्विट केला असता तर ते सहकुटुंब त्या फोटोत दिसले असते. त्यामुळे ही विकृत मानसिकता कुठेतरी संपवली पाहिजे.”

दरम्यान, संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो पोस्ट करत ते कॅसिनो खेळत असल्याचा दावा केला आहे. “19 नोव्हेंबर, मध्यरात्री, मुक्काम पोस्ट: मकाऊ,veneshine. साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात.

हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत ..खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना?”, असं संजय राऊत यांनी त्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

ते म्हणे.. फॅमिल सह मकाऊ ला गेले आहेत..जाऊ द्या. त्यांची सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणे.. कधीच जुगार खेळले नाहीत.. मग ते नक्की काय करीत आहेत?

त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल! झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय”, असही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही