Share

Chhagan Bhujbal | माझ्या भूमिकेला पक्षाचा पाठिंबा आहे की नाही याचा मी विचार करत नाही – छगन भुजबळ

🕒 1 min readChhagan Bhujbal | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. मराठा समाजाची ही मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने कुणबी नोंदणी शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. अशात मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला आहे.Related … Read more

Published On: 

🕒 1 min read

Chhagan Bhujbal | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे.

मराठा समाजाची ही मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने कुणबी नोंदणी शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. अशात मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला आहे.

याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) रस्त्यावर उतरलेले असून राज्यामध्ये जागोजागी सभा घेताना दिसत आहे. छगन भुजबळ यांच्या या भूमिकेला पक्षाचा पाठिंबा आहे की नाही? याबाबत अद्याप स्पष्टता नव्हती. अशात छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

Why should we be silent? – Chhagan Bhujbal

प्रसार माध्यमांशी बोलत असताना छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) म्हणाले, “मराठा समाजाच्या आंदोलनावरून मी आधी आक्रमक झालो नव्हतो. मात्र, त्यांनी गाव बंदी केली, लोकांची घरे जाळली, पोलिसांवर हल्ला झाला.

या सर्व घटनांनंतर आम्ही गप्प का बसावं? मी ( Chhagan Bhujbal ) माझी भूमिका घेऊन निघालो आहे. यासाठी मला पक्षाचा पाठिंबा आहे की नाही, याबाबत मी विचार करत नाही.”

दरम्यान, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी विरोध दर्शवला आहे.

त्यांच्या विरोधानंतर मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार काय निर्णय घेईल? याबाबत आता राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!