Manoj Jarange | टाईमबॉन्डवरून मनोज जरांगे आक्रमक; बच्चू कडूंसह घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

Manoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केली होती.

त्यानंतर राज्य शासनाने केलेल्या विनंतीवरून त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलं. उपोषण मागे घेतल्यानंतर राज्य शासनाने मराठा आरक्षणावर ठोस निर्णय घेण्यासाठी जरांगे ( Manoj Jarange ) यांच्याकडे 2 जानेवारीपर्यंत मुदत मागितली होती.

परंतु, त्यांनी सरकारला 2 जानेवारीपर्यंत मुदत न देता 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिला आहे. मात्र, सरकारकडून अद्याप मराठा आरक्षणाबाबत कोणताच निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.

याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे ( Manoj Jarange ) प्रहारचे आमदार बच्चू कडू ( Bacchu Kadu ) यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांची भेट घेणार आहे.

I am going to talk to Bacchu Kadu – Manoj Jarange

मनोज जरांगे ( Manoj Jarange ) म्हणाले, “सरकारच्या निर्णयाबाबत वाट बघून बघून मी अत्यंत परेशान झालो आहे. या पार्श्वभूमीवर आज मी बच्चू कडू यांच्याशी चर्चा करणार आहे.

नेमका हा काय विषय आहे? याबाबत मी ( Manoj Jarange ) बच्चू कडूंशी बोलणार आहे. सरकारला वेळ देऊन बरेच दिवस झाले आहे. टाईमबॉन्डबद्दल सर्वांसमोर चर्चा झाली आहे.

त्यानंतर जो शब्द ठरला होता, त्याबद्दल पत्रकार परिषद देखील झाली. सरकारने जर दिलेला शब्द पाळला नाही तर मराठा समाजासमोर ते उघडे पडतील.”

यानंतर मनोज जरांगे ( Manoj Jarange ) बच्चू कडू यांना घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. मराठ्यांच्या या मागणीला ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे.

याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे ( Manoj Jarange ) आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध झालेलं  दिसून आलं आहे. त्यानंतर मराठा आंदोलन आणखीन चिघळलेलं दिसलं.

या सर्व घटनानंतर राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काय निर्णय घेणार? याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.