Share

Vijay Wadettiwar | मी भुजबळांना सेनापती म्हटलेलं नाही; वडेट्टीवारांनी भुजबळ यांना दिलेला पाठिंबा मागे घेतला?

Vijay Wadettiwar | नागपूर: मराठा समाजाने केलेल्या मागणीला ओबीसी नेत्यांसह ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. यानंतर ओबीसी आणि मराठा समाज आमने-सामने आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar ) एकाच व्यासपीठावर दिसून आले. छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाच्या मागणीला विरोध … Read more

Published On: 

Vijay Wadettiwar | नागपूर: मराठा समाजाने केलेल्या मागणीला ओबीसी नेत्यांसह ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे.

यानंतर ओबीसी आणि मराठा समाज आमने-सामने आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar ) एकाच व्यासपीठावर दिसून आले.

छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाच्या मागणीला विरोध केला होता. त्यानंतर भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालं.

अशात विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar ) यांनी छगन भुजबळ यांना दिलेला पाठिंबा मागे घेतला असल्याचं दिसून आलं आहे. मी भुजबळांना सेनापती म्हटलेलं नाही, असं विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar ) यांनी म्हटलं आहे.

How can Chhagan Bhujbal become our general? – Vijay Wadettiwar

आज सकाळी प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar ) म्हणाले, “मी छगन भुजबळ यांना सेनापती म्हटलेलं नाही. ते कसले सेनापती? मी त्यांना का सेनापती म्हणु?

मी ओबीसींचे नेते म्हणून त्यांच्यावर बोललो आहे. आमचे सेनापती राहुल गांधी आणि खर्गे साहेब आहेत. छगन भुजबळ आमचे सेनापती कसे होऊ शकतात?

त्यांनी ओबीसी समाजाला प्रबोधन करण्यासाठी मेळावा घेतला, हीच माझ्या पक्षाची भूमिका आहे. मात्र, भुजबळ यांनी ज्या पद्धतीने टोकाचं वक्तव्य केलं आहे, त्याला माझं समर्थन नाही.”

शरद पवार यांच्या भेटीनंतर विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar ) यांनी आपली भूमिका बदलली असल्याच्या चर्चा सुरू आहे. यावर बोलताना ते ( Vijay Wadettiwar ) म्हणाले, “शरद पवारांच्या भेटीनंतर असं काही घडलेलं नाही.

मी यापूर्वी देखील माझी भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. शरद पवार महाराष्ट्राचे नेते आहे. ते माझ्या पक्षाचे नेते नाही. त्यामुळे त्यांच्या भेटीचा विषय नाही. मी एक ओबीसी कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी ओबीसींचा मंच शेअर करण्यासाठी गेलो होतो.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही