Manoj Jarange | भुजबळांसारख्या म्हाताऱ्या माणसाला मराठा आरक्षणामध्ये काय करायचं काही सुचत नाही – मनोज जरांगे

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Manoj Jarange | सातारा: मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे मराठा आरक्षणावरून आमने-सामने आले आहे. कारण मराठा समाजाने केलेल्या मागणीला छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे.

याच पार्श्वभूमीवर काल ओबीसींचा जालना जिल्ह्यात मेळावा झाला. या मेळाव्यामध्ये बोलत असताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांच्यावर टीका केली आहे.

यानंतर मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी छगन भुजबळ यांचा समाचार घेतला आहे. भुजबळांसारख्या म्हाताऱ्या माणसाला मराठा आरक्षणामध्ये काय करायचं काही सुचत नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

We do not want to give importance to Chhagan Bhujbal – Manoj Jarange 

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना मनोज जरांगे ( Manoj Jarange ) म्हणाले, “छगन भुजबळ यांच्यासारख्या म्हाताऱ्या माणसाला मराठा आरक्षणामध्ये काय करायचं काही सुचत नाही.

त्यामुळे त्यांनी आता आम्हाला सल्ले देऊ नये. आम्हाला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही. आम्हाला त्यांना महत्त्व द्यायचं नाही. घटनात्मक पदावर बसलेला माणूस घटना तुडवताना दिसत आहे.

त्यामुळे मला ( Manoj Jarange ) त्या माणसाबद्दल बोलायचं नाही. त्यांनी कितीही शक्ती लावली तरी आम्ही आमचं आरक्षण घेऊनच राहणार आहोत.”

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी ( Manoj Jarange ) महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू केलं आहे. राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.

त्यांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांसह ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ राज्यामध्ये सभा घेताना दिसत आहे.

तर दुसरीकडे मनोज जरांगे ( Manoj Jarange ) मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अशात 24 डिसेंबर पर्यंत राज्य शासन या मुद्द्यावर काय निर्णय घेईल? याबाबत आता राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहेत.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe