Maratha Reservation | पंढरपूर: मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रातील वातावरण अत्यंत तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी केली आहे.
त्यांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांसह ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर काल जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी समाजाचा भव्य मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये बोलत असताना मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी मनोज जरांगे यांच्यावर शाब्दिक वार केला आहे. यानंतर मराठा समाज भुजबळांविरोधात आक्रमक झाला आहे.
Immediately remove Chhagan Bhujbal from the cabinet
मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्या मागणीला ( Maratha Reservation ) विरोध दर्शवला आहे. त्याचबरोबर यावरून भुजबळांनी जरांगेंवर खोचक शब्दात टीका केली आहे.
याच पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात मराठा आंदोलकांनी भुजबळांचा पुतळा जाळला आहे. त्याचबरोबर या पुतळ्याला मराठा आंदोलकांनी जोडे मारून निषेध केला आहे. भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी देखील संतप्त मराठा आंदोलकांनी केली आहे.
“छगन भुजबळ हे मराठा समाजाचा द्वेष करणारे मंत्री आहे. त्यामुळे भुजबळांना तातडीने मंत्रिमंडळातून काढून टाकावं. त्याचबरोबर दोन्हीपैकी एकाही उपमुख्यमंत्र्यांनी कार्तिकी पूजेसाठी पंढरपुरात येऊ नये.
त्यांनी जर कार्तिकी एकादशीसाठी पंढरपुरात येण्याचा प्रयत्न केला तर त्यानंतर जे होईल त्यासाठी राज्य शासन जबाबदार राहील”, असं एका संतप्त आंदोलकाने म्हटलं आहे.
दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ( Maratha Reservation ) मनोज जरांगे यांनी राज्यामध्ये मोठा लढा उभारला आहे. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे.
तत्पूर्वी मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण होताना दिसत आहे. मराठा समाजाने केलेल्या मागणीवरून ( Maratha Reservation ) छगन भुजबळ आणि मनोज जरांगे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे.
त्यामुळे येत्या 24 डिसेंबर पर्यंत राज्य शासन मराठ्यांना आरक्षण ( Maratha Reservation ) देणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange | जर मराठा समाजाच्या नोंदी नव्हत्या, तर आज या नोंदी सापडल्या कशा? – मनोज जरांगे
- Manoj Jarange | मराठा समाजाला आरक्षण मिळणार म्हणून भुजबळ चलबिचल झालेय – मनोज जरांगे
- Maratha Reservation | मराठ्यांना आरक्षण मिळणार? राज्यात तब्बल 29 लाख कुणबी मराठा नोंदी सापडल्या
- Manoj Jarange | आमचा आणि ओबीसी समाजाचा व्यवसाय एकच, मग आम्हाला आरक्षण का नाही? – मनोज जरांगे
- Maratha Reservation | माझं बलिदान व्यर्थ जाऊ नये; मराठा आरक्षणासाठी 9 वीमध्ये शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या