Manoj Jarange | जर मराठा समाजाच्या नोंदी नव्हत्या, तर आज या नोंदी सापडल्या कशा? – मनोज जरांगे

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Manoj Jarange | सातारा: सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी आंदोलनाला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे  ( Manoj Jarange ) महाराष्ट्र दौऱ्यावर आहे.

आज ते साताऱ्यामध्ये दाखल झाले आहे. साताऱ्यामध्ये त्यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलत असताना मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी राज्य शासनाने पुढे सवाल उपस्थित केला आहे. 70 वर्ष मराठ्यांच्या लेकराचं वाटोळं कोणी केलं? असं मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी म्हटल आहे.

Marathas were not given reservation due to lack of evidence – Manoj Jarange

मनोज जरांगे ( Manoj Jarange ) म्हणाले, “गेल्या 70 वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण असून देखील ते मिळालं नाही. त्यांनी पुरावे लपून ठेवलेले होते. ज्या ज्या वेळी मराठा आरक्षणासाठी समिती स्थापन करण्यात आली, त्या-त्या वेळी समितीने पुरावे नाही म्हणून मराठ्यांना आरक्षण दिलं नाही.

त्यावेळी पुरावे नाही म्हणून सांगितलं होतं. परंतु, आज तेच पुरावे कसे काय सापडत आहे? सरकारने या प्रश्नाचं उत्तर आता आम्हाला द्यायला हवं. 70 वर्ष मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळ कुणी केलं? याचं उत्तर आता आम्हाला मिळायला पाहिजे. जर मराठा समाजाच्या नोंदी नव्हत्या, तर आज या नोंदी सापडल्या कशा?”

पुढे बोलताना ते ( Manoj Jarange ) म्हणाले, “गेल्या 70 वर्षांपासून आम्ही आरक्षणापासून वंचित आहोत. सरकार आमचा हा लॉस कसा भरून काढणार?

आम्हाला आता तो देखील भरून पाहिजे. आमच्या जागा कोणी बळकवल्या? याचं देखील आम्हाला उत्तर हवं आहे. मराठा समाजाला स्वतःच्या लेकरांच्या हितासाठी ताकतीने एकत्र यायला हवं.

24 डिसेंबरला सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी कायदा पारित करणार आहे. तोपर्यंत मराठा समाजाची ही कसोटी आहे. सरकार सध्या या मुद्द्यावर काम करत आहे.”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe