Manoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा समाज आमने-सामने आला आहे. या प्रकरणावरून काल ओबीसी समाजाचा जालना जिल्ह्यात एल्गार मेळावा झाला.
या मेळाव्यामध्ये बोलत असताना मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.
पार्श्वभूमीवर मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणार म्हणून भुजबळ चलबिचल झाले आहे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
Maratha community will get reservation – Manoj Jarange
मनोज जरांगे ( Manoj Jarange ) म्हणाले, “मराठा समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी मी राज्यात दौरे करत आहे. आपल्याला आरक्षण मिळणार, हे आता मराठा समाजाला माहीत झालं आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पश्चिम महाराष्ट्रात पहाटे 2 आणि 3 वाजता सभा होत आहे. आपल्या लेकरांना न्याय मिळावा यासाठी मराठा समाज एकत्र आला आहे.
मराठा समाजाने 70 टक्के आपली ही लढाई जिंकली आहे. आपल्याला कुणाच्याही टिकेकडे आणि आरोपाकडे लक्ष द्यायची गरज नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे, त्यामुळे ते चलबिचल झालेले आहे.”
पुढे बोलताना ते ( Manoj Jarange ) म्हणाले, “जिथे जिथे मराठा समाजाची सभा आहे, तिथे मराठा समाज एकत्र येत आहे. ऊन, वारा, पाऊस, थंडी या सर्व गोष्टी सोसत मराठा समाज सभांसाठी उपस्थित राहत आहे.
मराठा समाज आता आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही, ही बाब यातून लक्षात येत आहे. आता आमच्यावर कुणी कितीही टीका केली तरी आम्ही थांबणार नाही. त्याचबरोबर त्यांना मी महत्त्व देखील देणार नाही.”
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | मराठ्यांना आरक्षण मिळणार? राज्यात तब्बल 29 लाख कुणबी मराठा नोंदी सापडल्या
- Manoj Jarange | आमचा आणि ओबीसी समाजाचा व्यवसाय एकच, मग आम्हाला आरक्षण का नाही? – मनोज जरांगे
- Maratha Reservation | माझं बलिदान व्यर्थ जाऊ नये; मराठा आरक्षणासाठी 9 वीमध्ये शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या
- Manoj Jarange | मनोज जरांगेंचा बॅनर फाडल्यामुळे पोलिसात गुन्हा दाखल; FIR मध्ये भुजबळांचं नाव
- Raj Thackeray | जातीपातीच्या चिखलातून बाहेर या; भुजबळ-जरांगे वादात राज ठाकरेंची उडी