Share

Maratha Reservation | माझं बलिदान व्यर्थ जाऊ नये; मराठा आरक्षणासाठी 9 वीमध्ये शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून अत्यंत आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण ( Maratha Reservation ) मिळावं, यासाठी मनोज जरांगे यांनी राज्यात मोठा लढा उभा केला आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठा समाजाची  ( Maratha Reservation ) मागणी पूर्ण व्हावी यासाठी नांदेड जिल्ह्यात … Read more

Published On: 

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून अत्यंत आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण ( Maratha Reservation ) मिळावं, यासाठी मनोज जरांगे यांनी राज्यात मोठा लढा उभा केला आहे.

याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठा समाजाची  ( Maratha Reservation ) मागणी पूर्ण व्हावी यासाठी नांदेड जिल्ह्यात एका नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे.

My sacrifice should not go in vain

मराठा समाजाला आरक्षण ( Maratha Reservation ) मिळावं यासाठी नांदेड जिल्ह्यातील सोमेश्वर गावातील एका 9 वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे.

कोमल तुकाराम बोकारे, असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. तिने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. माझं बलिदान व्यर्थ जाऊ नये, मराठा समाजाला लवकर आरक्षण द्या. आई-बाबा मला माफ करा, असं तिने तिच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

मराठा आरक्षणासाठी ( Maratha Reservation ) आत्महत्या करणाऱ्या या तरुणीचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहे. अशात कोमलने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावं ( Maratha Reservation ) यासाठी राज्यामध्ये अनेक तरुण आत्महत्या करताना दिसले आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मराठा तरुण आरक्षणासाठी आत्महत्या करत आहे.

नांदेड जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी ( Maratha Reservation ) आतापर्यंत पाच लोकांनी आत्महत्या केली आहे. अशात मनोज जरांगे यांनी टोकाचं  पाऊल उचलू नका, असं आवाहन मराठा समाजाला केलं होतं.

तरी देखील मराठा तरुण आरक्षणासाठी  ( Maratha Reservation ) आपला जीव देताना दिसत आहे. या सर्व घडामोडीनंतर राज्यात मराठा समाजाचं आंदोलन आणखीन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही