Manoj Jarange | भुजबळांनी गोचिडासारखं मराठ्यांचं रक्त पिलयं – मनोज जरांगे

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Manoj Jarange | कोल्हापूर: मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण अत्यंत तापलं आहे. या मुद्द्यावरून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. छगन भुजबळ यांनी आज जालना जिल्ह्यात झालेल्या ओबीसी मेळाव्यातून मनोज जरांगे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला होता. तर आज संध्याकाळी कोल्हापूर येथे सुरू असलेल्या सभेमध्ये मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

मनोज जरांगे म्हणाले, “कालपर्यंत माझ्या नजरेत छगन भुजबळ यांच्यासाठी इज्जत होती. मात्र, आज बोलत असताना त्यांनी त्यांची पातळी सोडली आहे. काय बोलावं? हे त्यांना कळत नाही. त्यांनी माझं खाणं काढलं आहे. परंतु, मी त्यांची भाकर खातं नाही. तेच आमची भाकर खातात. ते माझ्या जेवणाबद्दल बोलले आहे. पण मी त्यांच्याबद्दल बोलायला लागलो तर अवघड होईल. त्यांनी गोचिडासारखं मराठ्यांचं रक्त पिल आहे. त्यांनी जनतेचा पैसा लुबाडला आहे. त्या पैशावर ते मोठे झाले आहे. त्यामुळे त्यांना जेलमध्ये बेसन भाकर खायला जावं लागलं.

मी त्यांच्याबद्दल बोलणं बंद केलं होतं. परंतु, ते काहीतरी मुद्दे घेऊन येतात आणि माझ्याबद्दल बोलतात. जो माझ्याबद्दल बोलेल त्याला मी सोडत नाही. सरकारने त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवायला हवं. त्यांना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची आहे. मात्र, आम्हाला शांततेत आंदोलन करून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था खराब करायची नाही. यापुढे देखील आम्हाला शांततेत आंदोलन करायचं आहे. त्यामुळे सरकारने त्यांचं बोलणं बंद केलं पाहिजे.”

महत्त्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe