Manoj Jarange | भुजबळांचं वय झालंय म्हणून ते काहीही बोलताय – मनोज जरांगे

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Manoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: ओबीसी समाजाने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर आज अंबड येथे ओबीसी नेत्यांचा मेळावा पार पडला.

या मेळाव्यात बोलत असताना छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी मनोज जरांगे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला होता. मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी छगन भुजबळ यांना सडतोड उत्तर दिलं आहे.

We will not give importance to Chhagan Bhujbal – Manoj Jarange

मनोज जरांगे ( Manoj Jarange ) म्हणाले, “छगन भुजबळ यांना आम्ही आजपासून महत्त्व देणार नाही. त्यांचं वय झालं आहे त्यामुळे ते काहीही बोलायला लागली आहे. आता त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही.

त्यांना काय करायचं ते करू द्या. त्यांना कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची आहे. मात्र आम्हाला ( Manoj Jarange )  कायदा आणि सुव्यवस्था खराब करायची नाही.

छगन भुजबळ यांनी संपूर्ण महाराष्ट्राला लुबाडून खाल्लं आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी ते माझ्यावर ( Manoj Jarange ) टीका करतात. गाव खेड्यातील मराठा आणि ओबीसी बांधव एकत्र आहे आणि ते त्यांना खपत नाही. त्यामुळे सहानुभूती मिळवण्यासाठी ते हे सर्व करत आहेत.”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe