Chhagan Bhujbal | अंबड: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये मोठा लढा उभारला आहे. राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.
त्यांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर जालन्यातील अंबडमध्ये आज ओबीसी समाजाची सभा पार पडली.
या सभेमध्ये बोलत असताना मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. दगडाला शेंदूर लावून जसं देव करतात तसं जरांगेंचं झालं आहे, असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटलं आहे.
Don’t we have children? – Chhagan Bhujbal
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, “मराठा आरक्षणासाठी यापूर्वी देखील अनेक आंदोलन झाली आहे. मात्र, त्यावेळेला दगडफेक, जाळपोळ इत्यादी घटना घडल्या नाही.
महाराष्ट्रामध्ये अनेक मोठे मराठा नेते होऊन गेलेले आहेत. त्यांनी सर्वांना सोबत जाण्याची भूमिका मांडली होती. घर जाळण्याची भूमिका त्यांनी मांडली नव्हती.
मराठा तरुणांना मला सांगायचं आहे की, तुम्ही कुठे मनोज जरांगेंच्या मागे लागत आहात? दगडाला शेंदूर लावून जसं देव करतात तसं जरांगेंचं झालं आहे. त्याला काही कळत नाही आणि वळत देखील नाही. तो फक्त लेकरं-लेकरं करत आहेत. आम्हाला काय लेकरं नाही का?”
पुढे बोलताना ते (Chhagan Bhujbal) म्हणाले, “तुम्हाला आरक्षण हवं असेल, तर तुम्ही वेगळं आरक्षण घ्या. मराठ्यांना आरक्षण पाहिजे असेल तर त्यांनी ते कायद्याने घ्यायला हवं.
परंतु, तुम्ही ते कायद्याने घेत नाही आहात. सर्वांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की, मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मराठ्यांचे आतापर्यंत 58 मोर्चे निघालेले आहे.
त्या मोर्चांना आम्ही कधीच विरोध केला नव्हता. इतरांच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण देऊ, असं देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी म्हटलं होतं. तेव्हा विरोधी पक्षात असून देखील आम्ही त्याला पाठिंबा दर्शवला होता.”
महत्वाच्या बातम्या
- Sushma Andhare | भाजपची मदत करायची असेल तर ती उघडपणे करावी; सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंचे कान टोचले
- Chhagan Bhujbal | मनोज जरांगे सासऱ्याच्या जीवावर जगतोय – छगन भुजबळ
- Manoj Jarange | मराठा समाजातील नेत्यांचा पाठिंबा मिळाला तर दोन तासात आरक्षण मिळेल – मनोज जरांगे
- Raj Thackeray | मनोज जरांगेंना कोण बोलायला सांगतंय? राज ठाकरेंची शरद पवारांवर नाव न घेता टीका
- Manoj Jarange | मराठा आरक्षणाविरोधात कुणी बोललं तर सोडणार नाही; मनोज जरांगेंचा ओबीसी नेत्यांना इशारा