Share

Chhagan Bhujbal | मनोज जरांगे सासऱ्याच्या जीवावर जगतोय – छगन भुजबळ

🕒 1 min readChhagan Bhujbal | अंबड: महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली आहे. परंतु, मराठा समाजाच्या या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेते जालना जिल्ह्यातील अंबड येथे एकवटले आहे. ओबीसीच्या या मेळाव्याला विजय वडेट्टीवार यांच्यासह छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) देखील उपस्थित … Read more

Published On: 

🕒 1 min read

Chhagan Bhujbal | अंबड: महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली आहे. परंतु, मराठा समाजाच्या या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे.

याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेते जालना जिल्ह्यातील अंबड येथे एकवटले आहे. ओबीसीच्या या मेळाव्याला विजय वडेट्टीवार यांच्यासह छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) देखील उपस्थित आहे. यावेळी बोलत असताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, “मनोज जरांगे यांना फक्त दोन शब्द येतात, ते म्हणजे आमचे लेकर बाळं. परंतु, आम्हाला लेकर बाळं नाही का? छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  दोन वर्ष तुरुंगातून बेसन भाकर खाऊन आले आहे, असं मनोज जरांगे म्हणत असतात.

हो! मी खाऊन आलो आहे. मी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) दिवाळीत देखील बेसन, भाकर आणि कांदा ठेचून खातो. हे मी स्वतःच्या कष्टाचं खातो. मी त्याच्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही.

आमच्या दलित समाजाला संविधानाने आरक्षण दिलं आहे. मात्र, आज देखील आमचा गोरगरीब दलित समाज झोपडपट्ट्यांमध्ये राहतो. ओबीसी समाजाची गरीबी अजूनही दूर झालेली नाही. ओबीसी आरक्षण नक्की काय आहे? हे आधी त्यांनी समजून घ्यायला हवं. नुसतं आम्हाला पण पाहिजे, म्हणून उपयोग नाही.”

We are not opposed to Maratha reservation – Chhagan Bhujbal

पुढे बोलताना ते (Chhagan Bhujbal) म्हणाले, “मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. आतापर्यंत मराठ्यांचे 58 मोर्चे निघालेले आहे. त्यावर आम्ही कधीच काही बोललो नाही.

त्याला आम्ही कधीच विरोध केला नाही. इतरांच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठ्यांना आरक्षण देऊ, असं देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी म्हटलं होतं. तेव्हा मी हात वर करून त्यांना पाठिंबा दर्शवला होता. परंतु, दुर्दैवानं ते आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकू शकलं नाही.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!