Weather Update | राज्यात थंडीचा कहर वाढणार; पुण्यासह मुंबईतील तापमानात होणार घट

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाने धुमाकूळ घातला होता. पुणे, मुंबई, ठाणे परिसरामध्ये पाऊस कोसळला होता. अशात पावसाचं सत्र संपलेलं असून पुन्हा एकदा थंडीची चाहूल लागण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

राज्यामध्ये किमान तापमानाचा पारा 14 ते 15 अंश सेल्सिअस पर्यंत आला आहे. त्यामुळे गारठा जाणवायला (Weather Update) लागला आहे.

The minimum temperature is likely to drop in the state

राज्यामध्ये थंडीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर भारतात पश्चिम हिमालिन क्षेत्रामध्ये पश्चिमी प्रकोपामुळे रविवारपासून राज्यात थंडी वाढू शकते.

तर आजपासून नंदुरबार, जळगाव, अमरावती, नाशिक, अहमदनगर, पुणे, मुंबई, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात काहीशी घसरण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे.

तर 19 ते 23 नोव्हेंबर दरम्यान बंगालच्या उपसागरात असलेल्या प्रणालीचं चक्रीवादळात रूपांतर झाल्यानंतर कोल्हापूर, सोलापूर, हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असल्याचं हवामान खात्याने (Weather Update) म्हटलं आहे.

Benefits of Amla

दरम्यान, देशासह राज्यातील वातावरण (Weather Update) सातत्याने बदलताना दिसत आहे. त्यामुळे या बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात आवळ्याचा समावेश करू शकतात.

आवळ्यामध्ये विटामिन सी, आयरन आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. हिवाळ्यामध्ये आवळ्याचे सेवन केल्याने पचन संस्था निरोगी राहते, सर्दी-खोकल्यापासून आराम मिळू शकतो, त्याचबरोबर केस देखील निरोगी राहू शकतात. त्यामुळे या वातावरणात निरोगी राहण्यासाठी तुम्ही आवळ्याचे सेवन करू शकतात.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.