Uddhav Thackeray | मुंबई: सध्या मध्य प्रदेशमध्ये निवडणुकांची लगबग सुरू आहे. या निवडणुकांच्या प्रचार सभेमध्ये बोलत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आयोध्या राम मंदिराच्या नावावरून लोकांना भाजपला मतदान करण्यास सांगितलं आहे.
मध्य प्रदेशमधील जनतेने भारतीय जनता पक्षाला मतदान केलं तर त्यांना अयोध्येत दर्शनाला घेऊन जाऊ असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
त्यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जय भवानी, जय शिवाजी म्हणत आम्हाला मतदान करा, असं मी जनतेला आवाहन करतो असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, “पंतप्रधान ज्याअर्थी बजरंगबली की जय म्हणत, मतदानाचं बटण दाबण्याचं, आवाहन करतात त्याप्रमाणेच आम्ही (Uddhav Thackeray) देखील येत्या निवडणुकीत जनतेला आवाहन करतो, जय भवानी, जय शिवाजी; हर हर महादेव, जय श्रीराम बोलून मतदान करा. राज्यकर्त्यांना सुबुद्धी मिळो म्हणून गणपती बाप्पा मोरया बोलून मतदान करा.”
Amit Shah may have opened a new Tour and Travels company – Raj Thackeray
दरम्यान, या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. या मुद्यावर भाष्य करत असताना राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा चांगला समाचार घेतला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, “अमित शाहांनी नवीन टूर अँड ट्रॅव्हल्स खातं उघडलं असेल. निवडणुका जिंकण्यासाठी राम मंदिराचं आमिष का दाखवता? तुम्हाला जर निवडणुका जिंकायच्या असतील तर कोणी काय काम केलं? हे सांगून निवडणूक लढवा आणि जिंका.”
महत्वाच्या बातम्या
- Shubman Gill | टीम इंडियाच्या चिंतेत भर! अंतिम सामन्यातून शुभमन गिल बाहेर?
- Raj Thackeray | दुसऱ्याच्या जातीचा द्वेष करणं हे राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात सुरू झालं – राज ठाकरे
- Raj Thackeray | अमित शाहांनी नवीन टूर अँड ट्रॅव्हल्स खातं उघडलं; मोफत अयोध्या वारीवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया
- Sharad Pawar | आमच्या भेटीचा अर्थ लवकरच कळेल; अजित पवारांच्या भेटीवर शरद पवारांचं सूचक वक्तव्य
- Vinayak Raut | अजित पवारांना पश्चाताप होत असून ते यातून मुक्त व्हायचा विचार करताय – विनायक राऊत