Shubman Gill | टीम इंडियाच्या चिंतेत भर! अंतिम सामन्यातून शुभमन गिल बाहेर?

Shubman Gill | टीम महाराष्ट्र देशा: काल (15 नोव्हेंबर) एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 2023 मधील पहिला उपांत्य फेरी सामना पार पडला.

या सामन्यामध्ये भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ एकमेकांना भिडले होते. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करून या स्पर्धेतील अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.

अशात वनडे वर्ल्ड कपच्या फायनल पूर्वी भारतीय संघासाठी चिंताजनक माहिती समोर आली आहे. या स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Ishan Kishan will get a chance in the team?

भारतीय संघाने न्युझीलँडविरुद्धचा उपांत्य फेरीतील सामना जिंकून वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. या सामन्यादरम्यान शुभमन गिल (Shubman Gill) खेळताना अडचणीत दिसला होता.

अशात त्याला (Shubman Gill) अंतिम सामन्यातून बाहेर पडावे लागू शकते. या सामन्यातून गिल (Shubman Gill) बाहेर पडला तर त्याच्या जागी इशान किशनला संघात संधी मिळू शकते.

परंतु, संघाकडून गिलच्या (Shubman Gill) फिटनेसबाबत कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी आणखीन दोन दिवस बाकी आहे. तत्पूर्वी शुभमन गिल (Shubman Gill) पूर्णपणे फिट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, शुभमन गिलसह (Shubman Gill) सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) देखील या स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून बाहेर पडू शकतो.

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये सूर्यकुमार यादवला अनेकदा संधी देण्यात आली आहे. परंतु, या स्पर्धेत तो चांगलं प्रदर्शन करू शकला नाही.

त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या जागी हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) संघात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) खेळपट्टी आणि परिस्थितीनुसार प्लेइंग-11 निवडू शकतो, अशा चर्चा सुरू आहे.

महत्वाची बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.