PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेतील 15 वा हप्ता मिळाला नाही; तर त्वरित करा ‘या’ गोष्टी

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: काल (15 नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री निधी सन्मान योजनेचा पंधरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवला आहे.

पीएम मोदी यांनी डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम पाठवली आहे. भारतातील 8 कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18, 000 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे.

अशात तुम्हाला जर या योजनेचा (PM Kisan Yojana) 15 वा हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही. कारण खालील गोष्टींच्या आधारे तुम्ही या योजनेतील 15 व्या हप्त्याचा लाभ मिळवू शकतात.

Narendra Modi has released the 15th installment of PM Kisan Yojana

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेतील (PM Kisan Yojana) 15 वा हप्ता जारी केला आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी, जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी आणि आधार कार्ड लिंक केलेले असेल त्याचं शेतकऱ्यांना या योजनेतील 15 व्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे.

या सर्व गोष्टी करून ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ मिळाला नाही, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. तुमचे नाव लाभार्थी यादीत न येण्याचं कारण जाणून घेण्यासाठी तुम्ही त्वरित जिल्ह्यातील संबंधित नोडल ऑफिसरशी संपर्क साधू शकतात. त्याचबरोबर शेतकरी 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या हेल्पलाइन क्रमांकवर संपर्क साधू शकतात.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी 24 फेब्रुवारी 2019 रोजी प्रधानमंत्री सन्मान योजना (PM Kisan Yojana) सुरू केली आहे.

या योजनेच्या (PM Kisan Yojana) माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करते. दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये सरकारी रक्कम शेतकऱ्यांना प्रदान करते. आतापर्यंत शेतकऱ्यांना योजनेतील 15 हप्ते मिळाले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.