Uddhav Thackeray | महागाई वाढणार, असं सांगत मोदींनी दिवाळीच्या उत्साहावर विरजण टाकलं; ठाकरे गटाचं टीकास्त्र

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये मोठ्या आनंदात आणि उत्साहात दिवाळी सण साजरा केला जात आहे. अशात महागाई वाढणार असल्याचा इशारा केंद्र सरकारने दिला आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं (Uddhav Thackeray) आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. भाजीपाल्यापासून धान्य कडधान्यापर्यंत डाळीपासून खाद्यतेलापर्यंत, जीवनावश्यक बाबींपासून चैनीच्या वस्तूंपर्यंत फक्त दरवाढच होत आहे.

याच वातावरणात दिवाळी आली आणि गेली. महागाईकडे दुर्लक्ष करीत, ‘उसने अवसान’ आणत जनतेने दिवाळी साजरी केली. मात्र आता दिवाळी संपता संपता केंद्र सरकारने पुन्हा एकदा सामान्य जनतेचा ‘अवसानघात’ केलाच.

महागाई वाढणार असा इशारा दिला आणि आपले हात झटकले. सरकारी उद्योगांची विक्री असो, सरकार बँकांचे खासगीकरण असो की महागाईचे खापर, स्वताची जबाबदारी झटकण्याचेच उद्योग केंद्रातील राज्यकर्त्यांकडून सुरू आहेत.

त्यामुळेच ‘महागाई वाढेल’ या सरकारच्या नवीन इशाऱ्याबाबतही ‘त्यात विशेष काय?” असाच प्रश्न सामान्यांना पडला आहे, असं आजच्या सामना अग्रलेखात (Uddhav Thackeray) म्हटलं आहे.

Read Samana Editorial

बुधवारी भाऊबीज उत्साहात पार पडली आणि ‘महागाई वाढणार’ असे सांगत केंद्र सरकारने दिवाळीच्या उत्साहावर विरजण टाकले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानेच महागाई वाढण्याचा इशारा दिला आहे.

ऑक्टोबर महिन्यात घाऊक महागाईचा दर उणे 0.52 टक्के होता. सलग सातव्या महिन्यात हा दर शून्याच्या खाली आला आहे. त्यात भाजीपाल्याच्या किंमतीतील चढ-उतार, खाद्यपदार्थांची दरवाढ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी यांमुळे नजीकच्या भविष्यात घाऊक महागाई वाढू शकते, असे नेहमीचे इशारे नगारे सरकारने वाजविले आहेत.

घाऊक महागाई वाढली तर किरकोळ महागाईही वाढणार हे स्पष्टच आहे. त्यामुळे पुढील काळात आणखी दरवाढीला तोंड देण्याची तयारी सामान्य जनतेला ठेवावी लागेल.

आता दिवाळी संपताना महागाईचा ‘बॉम्ब’ फोडण्याचा हा प्रकार योगायोग म्हणायचा की सरकारची चाल? दिवाळीपर्यंत थोपवलेल्या महागाईला ‘पुढे चाल देण्याचाच हा प्रयत्न आहे. कारण मोदी सरकार हा नेहमीचा फंडा आहे.

निवडणुका आल्या की इंधन गॅस दरवाढ रोखायची, प्रसंगी त्यांच्या दरात कपात करायची आणि महागाई कमी केल्याचे ढोल पिटायचे. निवडणुका पार पडल्या की परत महागाई जैसे थे करायची.

निवडणुकीपूर्वी जनतेच्या भावनांना हात घालायचा आणि निवडणुका संपल्या की जनतेच्या खिशात हात घालायचा. आताही दिवाळी संपता संपता मोदी सरकारने तेच केले आहे. पुन्हा नेहमीप्रमाणे या दरवाढीसाठी बोट दाखवायला निसर्ग आणि जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आहेतच.

या वर्षी कमी झालेला पाऊस, लांबलेला मान्सून, त्यात बसलेले अवकाळीचे तडाखे, त्यामुळे कमी झालेली खरिपाची पेरणी, धरणातील कमी पाणीसाठयामुळे रब्बी हंगामावर होणारा परिणाम, जागतिक पातळीवर इंधन आणि अन्नधान्य पुरवठा याबाबत असलेली अनिश्चितता अशी अनेक कारणे केंद्र सरकार देशातील महागाईबाबत पुढे करणार, हे स्पष्ट आहे.

त्यात काही प्रमाणात तथ्य असले तरी प्रत्येक बाबतीत फक्त बोट दाखवून हात वर करणार असाल तर तुम्ही सत्तेत का बसला आहात? वास्तविक, या परिस्थितीतून मार्ग काढत सामान्यांना कमीत कमी त्रास कसा होईल, हे राज्यकर्ते म्हणून तुम्ही पाहायला हवे.

मात्र त्याऐवजी असलेल्या नसलेल्या कारणांकडे बोट दाखवायचे आणि दरवाढीच्या जबाबदारीपासून हात झटकायचे. 2014 पासून देशात हेच सुरू आहे. त्यामुळेच महागाई आणि दरवाढ ही सामान्य जनतेसाठी ‘विशेष’ गोष्ट राहिलेली नाही.

2014 मध्ये ‘महंगाई डायन’च्या नावाने आधीच्या यूपीए सरकारच्या नावाने शिमगा करणारेच मागील नऊ वर्षे सत्तेत आहेत. तरीही महंगाई डायन सर्वसामान्यांच्या मानगुटीवरून उतरायला तयार नाही.

‘स्वस्ताई’ची स्वप्ने दाखविणाऱ्या ‘सौदागरांना केंद्रात सलग दोनदा बहुमताने जनतेने सत्तेत बसविले, पण स्वस्ताई आणि ‘अच्छे दिन’ हे आजही जनतेसाठी स्वप्नच आहे.

भाजीपाल्यापासून धान्य-कडधान्यापर्यंत, डाळींपासून खाद्यतेलापर्यंत, जीवनावश्यक बाबींपासून चैनीच्या वस्तूंपर्यंत फक्त दरवाढच होत आहे. याच वातावरणात दिवाळी आली आणि गेली महागाईकडे दुर्लक्ष करीत, ‘उसने अवसान’ आणत जनतेने दिवाळी साजरी केली.

मात्र आता दिवाळी संपता संपता केंद्र सरकारने पुन्हा एकदा सामान्य जनतेचा ‘अवसानघात’ केलाच. महागाई वाढणार असा इशारा दिला आणि आपले हात झटकले.

सरकारी उद्योगांची विक्री असो, सरकार बँकांचे खासगीकरण असो की महागाईचे खापर, स्वतःची जबाबदारी झटकण्याचेच उद्योग केंद्रातील राज्यकर्त्यांकडून सुरू आहेत. त्यामुळेच ‘महागाई वाढेल’ या सरकारच्या नवीन इशाऱ्याबाबतही ‘त्यात विशेष काय?’ असाच प्रश्न सामान्यांना (Uddhav Thackeray) पडला आहे.

सौजन्य – सामना

महत्त्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.