IND vs NZ | धोनी-तेंडुलकरला जे जमलं नाही ते कोहलीने केलं; मैदानात उतरताच कोहलीचा नवा विक्रम

IND vs NZ | मुंबई: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 2023 मधील पहिला उपांत्य सामना आज मुंबई येथील वानखेडे मैदानावर खेळला जात आहे.

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) हे दोन्ही संघ हा सामना खेळत आहे. भारतीय संघाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी प्रथम फलंदाजी करत दमदार सुरुवात केली.

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) फलंदाजीसाठी मैदानावर उतरला आहे. मैदानावर उतरताच त्याच्या नावावर अनोखा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे.

Virat Kohli has reached the semi-finals of the World Cup four times

मुंबईमध्ये सुरू असलेला वनडे वर्ल्ड कपचा पहिला उपांत्य सामना (IND vs NZ)  विराट कोहलीसाठी अत्यंत खास आहे. कारण विराट कोहली एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चौथ्यांदा उपांत्य सामना खेळत आहे.

तब्बल चार वेळा विराट कोहली वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत उतरला आहे. विराट कोहलीने 2011, 2015, 2019 वनडे वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये उपांत्य फेरी सामना खेळला आहे. तर आज तो वनडे वर्ल्ड कप 2023 मधला उपांत्य फेरी सामना खेळत आहे

हा कारनामा करणारा विराट कोहली पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. विराट कोहली पूर्वी हा कारनामा कोणत्याही भारतीय खेळाडूला करता आलेला नाही.

दरम्यान, भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) या सामन्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने देखील उत्कृष्ट फलंदाजी केली आहे.

या सामन्यामध्ये (IND vs NZ) रोहित शर्माने चौफेर फटकेबाजी करत इतिहास रचला आहे. भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) सामना सुरू होताच रोहित शर्माने पहिल्या 7 षटकांमध्ये 4 चौकार आणि 4 षटकार ठोकले आहे.

त्यानंतर तो वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासात 50 षटकार मारणारा रोहित शर्मा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

त्याचबरोबर या खेळीदरम्यान त्याने ख्रिस गेलचा वर्ल्ड कपमधील सर्वाधिक षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.