IND vs SL | टीम इंडियाला मोठा झटका! जसप्रीत बुमराह ODI मधून बाहेर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IND vs SL | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये 10 जानेवारीपासून एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. ही मालिका सुरू होण्याआधीच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bhumrah) याचे या मालिकेमध्ये दुखापतीनंतर पुनरागमन झाले होते. मात्र, तो आता एकदिवसीय संघातून बाहेर पडला आहे. बुमराह आधी या मालिकेचा भाग नव्हता, पण नंतर त्याचा संघात समावेश करण्यात आला होता. अशा परिस्थितीत आता पुन्हा तो संघातून बाहेर गेला आहे.

जसप्रीत बुमराहला वनडे मालिकेमध्ये भारतीय संघात स्थान मिळालं नव्हतं. मात्र, 3 जानेवारी रोजी त्याला संघात सामील करण्यात आले होते. दरम्यान या निर्णयानंतर अवघ्या सहा दिवसात तो पुन्हा संघातून बाहेर झाला आहे. भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध गुवाहाटी येथे पहिला एकदिवसीय सामना खेळणार आहे.

जसप्रीत बुमराहचे एकदिवसीय संघामध्ये पुनरागमन झाल्यामुळे भारतीय संघ मजबूत झाला होता. मात्र, तो या मालिकेतून बाहेर पडत असल्यामुळे भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार, बुमराह इतर खेळाडूंसोबत गुवाहाटीमध्ये पोहोचला नाही.

सप्टेंबर 2022 पासून बुमराह क्रिकेट मैदानापासून लांब आहे. तो पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. या दुखापतीमुळे तो वर्ल्ड कपमध्ये देखील खेळू शकला नव्हता. नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये तो त्याच्या दुखापतीवर काम करत होता. दरम्यान, त्याला तंदुरुस्त घोषित करण्यात आलं होतं. फिट घोषित झाल्यानंतर त्याचा भारतीय संघामध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा त्याला आराम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या