PM Kisan Yojana | शेतकऱ्यांची दिवाळी गोड! तब्बल 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता जारी

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. कारण पीएम मोदींनी पीएम किसान योजनेचा पंधरावा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला आहे.

देशातील आठ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना या (PM Kisan Yojana) योजनेच्या पंधराव्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज झारखंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांना ही आनंदाची वार्ता दिली आहे.

2000 has been transferred to the accounts of more than 8 crore farmers

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री निधी सन्मान योजनेचा (PM Kisan Yojana) पंधरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे.

भारतातील 8 कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18, 000 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे.

डीबीटीद्वारे देशातील 8 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये (PM Kisan Yojana) हस्तांतरित करण्यात आले आहे.

ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी, जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी आणि आधार कार्ड लिंक केलेले असेल, त्याचं शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रधानमंत्री मोदींनी या योजनेतील (PM Kisan Yojana) पंधरावा हप्ता पाठवला आहे.

दरम्यान, देशातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सन्मान योजना (PM Kisan Yojana) सुरू केलेली आहे.

या योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. केंद्र सरकार दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांना देते.

शेतकऱ्यांना आतापर्यंत या योजनेच्या 14 हप्त्यांचा लाभ मिळाला आहे. अशात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा 15 वा हप्ता जारी करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे.

https://pmkisan.gov.in/ अधिकृत वेबसाईटला भेट देऊन शेतकरी लाभार्थ्यांची (PM Kisan Yojana) यादी तपासू शकतात.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.