Nitesh Rane | उबाठा सेनेत उद्धव ठाकरेंसह सगळे सोंगाडे भरलेय – नितेश राणे

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) अनेकदा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतात. अशात भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाला धारेवर धरलं आहे.

उबाठा सेनेत उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) सगळे सोंगाडे भरले आहे, असं म्हणत नितेश (Nitesh Rane) राणे यांनी ठाकरे गटावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. त्यांच्या (Nitesh Rane) या वक्तव्यावर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येईल? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Should Sanjay Raut be wished on April 15 or November 15? – Nitesh Rane

नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, “उबाठा सेनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासह सगळे सोंगाडे आणि 420 भरले आहे. एक तो चिपळूणचा सोंगाड्या आणि दुसरा भांडुपचा देवानंद (संजय राऊत).

काही लोक जन्मजात सोंगाडे असतात. संजय राजाराम राऊत यांनी जरा हे सांगावं की, 2004 ते 2016 निवडणुकांच्या ऍफिडेविटमध्ये तुमची जन्म तारीख 15 एप्रिल 1961 आहे.

तर 2016 ते 2028 पर्यंतच तुम्ही जे ऍफिडेविट भरलं आहे, त्याच्यामध्ये तुमची जन्म तारीख 15 नोव्हेंबर 1961 आहे. तुम्ही तुमची जन्मतारीख का बदलली?

यामध्ये तुमची कोणती 420 आहे? याबाबत महाराष्ट्रातील जनतेला स्पष्टीकरण मिळायला हवं. तुम्हाला शुभेच्छा 15 एप्रिलला द्यायच्या की 15 नोव्हेंबरला द्यायच्या? याबद्दल तुम्ही आज सांगायला हवं.”

दरम्यान, आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत यांनी अजित पवार गटाला धारेवर धरलं आहे. “2024 च्या निवडणुकांमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला माती चारल्याशिवाय राहणार नाही.

भविष्यामध्ये महाराष्ट्रात दोनच नेते राहणार आहे. यापुढे तुम्हाला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं यशस्वी राजकारण झालेलं दिसेल.

अजित पवार आणि शरद पवार दोघांचंही मैदान बारामती आहे. परंतु, शरद पवार बारामती जिंकतील. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचं नेतृत्व असेल”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.