Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: देशासह राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यामध्ये एकीकडे थंडी वाढत चालली आहे, तर दुसरीकडे हवामान खात्याने पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन हवामान खात्याकडून (Weather Update) करण्यात आले आहे.
A low pressure area is likely to form in South East Bay of Bengal
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. पुणे, मुंबई, ठाणे, पालघर इत्यादी जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला.
त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून या भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. अशात पुढील चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे.
दक्षिण पूर्व बंगाल उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपमधील काही भागांमध्ये याचा परिणाम दिसून आला आहे. या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.
येत्या आठवड्यामध्ये दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने (Weather Update) दिला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीसह गोव्यातही बहुतांश भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने (Weather Update) वर्तवली आहे.
Benefits of Raisins
दरम्यान, या बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेल्या मनुकांचे सेवन करू शकतात.
नियमित याचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो, पचन संस्था निरोगी राहते, त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. त्यामुळे या बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेल्या मनुकांचे सेवन करू शकतात.
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange | 75 वर्षात मराठा समाजासाठी कुणी काय केलं? हे सर्वांसमोर मांडणार – मनोज जरांगे
- Maratha Reservation | भुजबळांविरोधात मराठा समाज आक्रमक; घेतला भुजबळांना मतदान न करण्याचा निर्णय
- Rohit Pawar | ओबीसी नेत्यांना पुढे करून देवेंद्र फडणवीस वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करताय – रोहित पवार
- Sharad Pawar | माझी जात कोणती? हे जगाला माहितीये; व्हायरल ओबीसी दाखल्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया
- Bacchu Kadu | ओबीसी खतरे मे है, असं म्हणणं भुजबळांची राजकीय खेळी – बच्चू कडू