Bacchu Kadu | ओबीसी खतरे मे है, असं म्हणणं भुजबळांची राजकीय खेळी – बच्चू कडू

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Bacchu Kadu | अमरावती: महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी धडपड करत आहे. राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे.

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाच्या या मागणीला विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.ओबीसी खतरे मे है, असं म्हणणं भुजबळांची राजकीय खेळी आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

Politics has become more important than reservation – Bacchu Kadu

प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना बच्चू कडू म्हणाले, “सध्या आरक्षणापेक्षा राजकारण महत्त्वाचं झालं आहे. भारतीय जनता पक्ष ओबीसीच्या मागे ठामपणे उभा राहिला आहे.

त्याचबरोबर काँग्रेसने देखील ओबीसीला पाठिंबा दर्शवला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी देखील त्यांनाच पाठिंबा देत आहे. या तिन्ही पक्षांनी ओबीसीला धरून राजकारण करायचं ठरवलं आहे.

मराठा विरुद्ध इतर समाज करण्यासाठी हा सर्व प्रयत्न आहे. या सर्व घडामोडींवरून छगन भुजबळ फक्त आव आणण्याचा प्रयत्न करत आहे.

त्यांना लोकहित आणि समाज हितापेक्षा राजकारण महत्त्वाचं वाटतं. या सर्व प्रकरणांमध्ये कुणबी आमदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

पुढे बोलताना ते (Bacchu Kadu) म्हणाले, “ओबीसी समाज माझ्याविरुद्ध आक्रमक होण्यापेक्षा त्यांना माझ्या (Bacchu Kadu) विरोधात आक्रमक केलं जाणार आहे.

सर्वात जास्त शेती हा ओबीसी समाज करत आहे. शेतीचे प्रश्न सुटले तर हे प्रश्न सुटतील, हे सूर्यप्रकाशाएवढं सत्य आहे. परंतु, शेतीचे प्रश्न घेऊन जर ओबीसी नेते समोर आले तर आग लागत नाही.

मात्र, मराठा विरुद्ध ओबीसी केलं तर आग भडकायला वेळ लागत नाही. त्यामुळे यांनी सरळ-सरळ आग लावायचं काम सुरू केलं आहे. धर्म आणि जातींमुळे शेतकऱ्याचे प्रश्न नेहमी मागे राहिले आहे.

माझी सत्ता कशी येईल, यासाठी सर्व आता हिंदू खतरे मे है, मुसलमान खतरे मे है, असं म्हणतं आपली राजकीय खेळी खेळणार आहे. ओबीसी खतरे मे है, धनगर खतरे मे है, असं म्हणत हा वाद पेटवला जात आहे.”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe