Sharad Pawar | अजित पवारांच्या दिवाळी पहाटच्या अनुपस्थितीवर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Sharad Pawar | बारामती: आज देशामध्ये दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार आपल्या परिवारासह बारामती येथील गोविंद बागेत दिवाळी पाडवा साजरा करत आहे.

दरवर्षी पाडव्यानिमित्त या ठिकाणी पवार कुटुंब एकत्र येतं. मात्र, यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) आणि  शरद पवार (Sharad Pawar) दिवाळी पाडव्यासाठी एकत्र येतील का? असा प्रश्न उपस्थित झाला होता.

या चर्चा सुरू असताना अजित पवार या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. याच पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Everyone has a reason

शरद पवार (Sharad Pawar)  म्हणाले, “प्रत्येकाची काही ना काही कारण आहेत. कोणाचं वैयक्तिक कारण आहे, तर कोणाचं आजारपणाचं कारण आहे.

रोहित पवार यांची संघर्ष यात्रा आहे. त्यानिमित्ताने त्यांचा दौरा सुरू आहे. त्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. त्याचबरोबर प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न असतात.

कुणाचा आजार आहे, त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही. म्हणून आज सगळे गोविंद बागेत उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे याबाबत कोणताही गैरसमज करून येण्याचं कारण नाही.”

दरम्यान, अजित पवार यांच्या अनुपस्थितीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

“अजित पवारांना डेंग्यूची लागण झाली आहे आणि याबाबत सर्वांना माहीत आहे. डेंग्यूमुळे अजित पवार गेल्या काही दिवसांपासून कोणत्याच कार्यक्रमाला गेलेले नाही.

प्रत्येकजण आपली आणि आपल्या आरोग्याची काळजी घेत असतो. अजित पवार यांच्यासह रोहित पवार देखील आज येथे उपस्थित नाही.

ते त्यांच्या संघर्ष यात्रेनिमित्त बीड दौऱ्यावर आहे. त्यामुळे काही गोष्टी आपण सर्वांनी मोठ्या मनाने स्वीकारायला पाहिजे”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe