Sanjay Raut | अयोध्येतील राम मंदिर उभं करण्यात भाजपचं योगदान नाही – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: मध्यप्रदेशमध्ये सध्या निवडणुकांचं सत्र सुरू आहे. या निवडणुकांचा प्रचार करत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मोठं विधान केलं आहे. मध्यप्रदेशच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला मत दिली, तर मध्यप्रदेशच्या जनतेला अयोध्यामध्ये मोफत दर्शन मिळेल, असं अमित शाह यांनी एका प्रचार सभेमध्ये म्हटलं असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत … Read more

Published On: 

Sanjay Raut | मुंबई: मध्यप्रदेशमध्ये सध्या निवडणुकांचं सत्र सुरू आहे. या निवडणुकांचा प्रचार करत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मोठं विधान केलं आहे.

मध्यप्रदेशच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला मत दिली, तर मध्यप्रदेशच्या जनतेला अयोध्यामध्ये मोफत दर्शन मिळेल, असं अमित शाह यांनी एका प्रचार सभेमध्ये म्हटलं असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

याच मुद्द्यावरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. अयोध्येतील राम मंदिर उभं करण्यात भाजपचं योगदान नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “मध्यप्रदेशमध्ये ज्या निवडणुका सुरू आहे, त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव होताना दिसत आहे.

मध्यप्रदेशमध्ये भाजपचे सर्व वरिष्ठ नेते उतरले आहे. मध्यप्रदेशच्या लोकांनी भारतीय जनता पक्षाला मत दिली तर त्यांना अयोध्येमध्ये मोफत दर्शन मिळेल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यप्रदेशच्या जनतेला सांगितलं आहे. त्यांचं हे विधान अत्यंत घृणास्पद आहे”

Does Ramlalla belong to Bharatiya Janata Party? – Sanjay Raut

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “मध्यप्रदेशच्या जनतेने भाजपला मत दिले तर त्यांना रामलल्लाचं दर्शन दिलं जाईल नाही तर त्यांना रोखलं जाईल.

मात्र, रामलल्ला भारतीय जनता पक्षाच्या मालकीचा आहे का? रामलल्लाने भाजपला त्यांचं एजंट नेमलं आहे का? रामलल्ला सर्वांचे आहेत.

देशाचे, विश्वाचे, प्रत्येक मानव जातीचे ते आहेत. त्यांच्यावर मालकी हक्क सांगणारा भारतीय जनता पक्ष कोण आहे? त्यांनी रामलल्लाला राजकारणामध्ये फ्री आणलं आहे. परंतु, रामलल्ला आणि अयोध्या त्यांची मालकीची नाही”

“आजची आयोध्या आणि राम मंदिर उभं करण्यात भारतीय जनता पक्षाचं योगदान नाही. या देशातील असंख्य राम भक्त, कर सेवक आणि हिंदुत्ववादी संघटनांमुळे आजचं राम मंदिर उभं राहत आहे.

या मंदिराचा सातबारा भारतीय जनता पक्षाच्या नावावर केलेला नाही. म्हणून त्यांनी त्यांचे हे शब्द मागे घेऊन, जनतेची आणि रामलल्लाची माफी मागायला हवी”, असही त्यांनी (Sanjay Raut) म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही