Rohit Pawar | अर्थमंत्र्यांच्या मंत्र्यांना निधी मिळत नाही, तर मग खरा अर्थमंत्री कोण? रोहित पवारांचा खडा सवाल

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहेत.

अशात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. राज्यात अर्थमंत्र्यांच्या मंत्र्यांना निधी मिळत नाही, तर मग खरा अर्थमंत्री कोण? असा सवाल आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.

BJP will use Shinde group and Ajit Pawar group till Loksabha elections – Rohit Pawar

रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “अर्थमंत्र्यांच्या खात्यामधील मंत्र्यांना निधी मिळत नसेल, तर खरा अर्थमंत्री कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

यावरून नक्कीच काहीतरी वाद सुरू आहे, याचा अंदाज आपण बांधू शकतो. केंद्रात जाऊन या वादावर चर्चा केल्यानंतर हा वाद मिटणार का? माहित नाही. मात्र, लोकसभा निवडणुकांपर्यंत भारतीय जनता पक्ष शिंदे गट आणि अजित पवार गटाचा वापर करून घेणार आहे.”

दरम्यान, 02 जुलै 2023 रोजी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. या दिवशी अजित पवार शरद पवारांना सोडून राज्य सरकारमध्ये सामील झाले.

राज्य सरकारमध्ये सामील होताच अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची तर त्यांच्यासह आलेल्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

त्यानंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर राज्याचं अर्थ खात अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आलं. अजित पवारांना अर्थ खात देऊ नये, अशी भूमिका शिंदे गटाने मांडली होती.

याबाबत दोन्ही गटात वादविवाद झाले असल्याच्या चर्चा देखील सुरू होत्या. या सर्व घडामोडीनंतर अजित पवारांना अर्थ खात देण्यात आलं. त्यानंतर पुन्हा एकदा निधीवरून दोन्ही गटात वाद सुरू असल्याचा चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.