Share

Nitesh Rane | राज्यात नवा ज्योतिषी आलाय; नितेश राणेंनी रोहित पवारांचे कान टोचले

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट अनेकदा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे. अशात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवारांबाबत (Ajit Pawar) मोठं विधान केलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकानंतर शिंदे गट आणि … Read more

Published On: 

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट अनेकदा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे.

अशात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवारांबाबत (Ajit Pawar) मोठं विधान केलं आहे.

आगामी लोकसभा निवडणुकानंतर शिंदे गट आणि अजित पवार गटातील काही नेते भाजपमध्ये जातील, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रामध्ये नवा ज्योतिषी आला आहे, असं म्हणत नितेश राणे (Nitesh Rane) यांनी रोहित पवार यांचा समाचार घेतला आहे.

A new face reading astrologer has arrived in Maharashtra – Nitesh Rane

नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये चेहरा वाचणारा नवीन ज्योतिषी आला आहे. या ज्योतिषीला अजित पवारांच्या चेहऱ्यावर काय लिहिलं आहे? देवेंद्र फडणवीस कुणाच्या मागे आहेत? याबाबत माहिती आहे. तो मोठा ज्योतिषी या सर्व मुद्द्यांवर भाष्य करतो.”

दरम्यान, या मुद्द्यावर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील भाष्य केलं आहे. “अजित पवारांवर सध्या रडण्याची परिस्थिती निर्माण झाली असेल.

कारण भाजप आपल्यासोबत आलेल्यांना खूप रडवतो. त्याचबरोबर अजित पवारांना आगामी निवडणुका भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर लढाव्या लागू शकतात, असं मला वाटत आहे.

अजित पवारांकडे कमळावर निवडणूक लढवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, हे मी अत्यंत ठामपणे सांगत आहेत. कारण दिल्ली पुढे झुकलेले आता आपली दादागिरी दाखवू शकत नाही”, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install