Manoj Jarange | विजय वडेट्टीवार काही कामाचे नाही, असं म्हणून आम्ही त्यांना सोडून दिलंय – मनोज जरांगे

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Manoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे.

मराठ्यांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांसह ओबीसी समाजाने देखील विरोध दर्शवला आहे. यामध्ये विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांचा देखील समावेश आहे.

अशात विजय वडेट्टीवार यांना जीवे-मारण्याची अज्ञातांकडून धमकी मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Who is threatening Vijay Wadettiwar?

मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले, “विजय वडेट्टीवार यांचा मराठा समाजाला विरोध आहे. त्यांच्या मनात मराठा समाजाविषयी पाप आहे. विजय वडेट्टीवार यांना धमकी देणारा कोण आहे? याबाबत आम्हाला काहीच माहित नाही.

ते नेहमी मराठा समाजाच्या विरोधात बोलतात. त्यांनी याबद्दल बोलायला नाही पाहिजे. मात्र, ते त्यांचे विचार आहेत. त्यांना धमकी देणाऱ्यांनी धमकी देऊ नये.

त्यांना सध्या काही काम नाही, त्यामुळे आम्ही (Manoj Jarange) त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया देणं बंद केली आहे. त्यामुळे ते काहीच कामाचे नाही, असं म्हणून मराठा समाजाने त्यांना सोडून दिलं आहे.”

दरम्यान, जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला सुरुवात केली होती.

त्यानंतर त्यांचं हे आंदोलन संपूर्ण राज्यात पसरताना दिसलं. त्यानंतर ओबीसी समाजाने मराठा समाजाच्या मागणीला विरोध केला. त्यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्यासह विजय वडेट्टीवार यांचा समावेश होता.

याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेते आणि मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यामध्ये शाब्दिक चकमक होताना दिसली आहे. या प्रकरणावरूनच विजय वडेट्टीवार यांना धमकी देण्यात आली असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe