Share

“समाजाला न्याय मिळत असेल तर टिंगलटवाळी चालेल” : चंद्रशेखर बावनकुळे

जरांगे यांच्या टीकेला भावनिक उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, समाजाला न्याय मिळत असेल तर माझी टिंगलही मान्य आहे.

Published On: 

Chandrashekhar Bawankule reacts to Jarange’s criticism.

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे सातत्याने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर टीका करत आहेत. जरांगे पाटील यांनी बावनकुळे यांच्या मनाला लागेल अशी विधाने केली आहेत.

आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सततच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ‘आपल्यालाही कुटुंब आहे,’ असे सांगताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पत्रकार परिषदेत भावूक झाले. सध्या मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत.

Chandrashekhar Bawankule reacts to Jarange’s criticism.

“माझ्याबद्दल व्यंग करुन, माझ्याबद्दल वाईट बोलून माझ्या शरीरावर, चेहऱ्यावर टीका करुन त्यांना आनंद मिळत आहे. यातून त्यांच्या समाजाला न्याय मिळणार असेल तर नक्कीच त्यांनी माझी टिंगलटवाळी करावी.” असे चंद्रशेखर बावनकुळे बोलले.

“मी कधी वाईट वागलो नाही. जातीभेद केला नाही. मराठा ओबीसी वादात पडलो नाही. माझ्याबद्दल गैरसमज झाला असेल, महसूल खात्याचे इतके काम केल्यानंतर व्यंग होत असेल तर त्याला अर्थ नाही. माझेही कुटुंब आहे. माझी पत्नी कुणबी आहे, सूनबाई मराठा आहे.” असे बावनकुळे यांनी सांगितले.

मनोज जरांगे काय म्हणाले?

“चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सांगण्यावरून मराठा समाजाच्या कुणबी नोंदी रद्द करण्यात आल्या.” असा आरोप मनोज जरांगे पाटील करत आहे. ”मंत्र्यांचे ऐकून कोणत्याही अधिकाऱ्याने त्याची प्रतिष्ठा पणाला लावू नये. अन्यथा तुम्हाला तुरुंगात जावं लागेल.” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

“बावनकुळे हा माणूस फार विचित्र दिसतोय. बावनकुळे तुम्ही पाप केलं आहे. तुम्हाला आता ते भोगावंच लागणार आहे. तुम्ही मराठ्यावर अन्याय केला आहे” अशी बोचरी टीका मनोज जरांगे यांनी केली. मनोज जरांगे यांनी सातत्याने राजकीय नेत्यांना टार्गेट केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही