Share

Sanjay Raut | CM शिंदेंच्या अंतर्वस्त्रांवर कमळचं – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकानंतर शिंदे गट भाजपमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. एकनाथ शिंदेंच्या अंतर्वस्त्रांवर कमळचं आहे, असं … Read more

Published On: 

Sanjay Raut | मुंबई: आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकानंतर शिंदे गट भाजपमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.

एकनाथ शिंदेंच्या अंतर्वस्त्रांवर कमळचं आहे, असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Slaves have no opinion and no self-respect – Sanjay Raut

आज (13 नोव्हेंबर) सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “सध्या एकनाथ शिंदे भाजपमध्येच आहे.

तुम्ही जर एकनाथ शिंदे यांचे अंतर्वस्त्र पाहिले तर त्यावर तुम्हाला कमळ दिसेल. ते आत्तापासूनच भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाले आहे.

त्याशिवाय ते मुख्यमंत्रीपदी किंवा मंत्रीपदी राहू शकत नाही. नंतर नाही ते आत्ताच भारतीय जनता पक्षामध्ये गेले आहे. आत्ताच ते त्यांचे गुलाम झाले आहेत. गुलामांना स्वतःचं मत आणि स्वाभिमान नसतो.”

दरम्यान, ठाकरे गटानं (Sanjay Raut) आजचा सामना अग्रलेखाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

‘एकच प्याला ‘नाटकातील ‘आर्य मदिरा मंडळा’त होणारे नाटक आज महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे हे सध्या अल्लाबक्षच्या भूमिकेत वावरत आहेत व ते भाजपच्या ढोंगी हिंदुत्वाचा प्रचार करीत आहेत.

सत्य पायदळी तुडवून त्यांनी ‘खोटे’ छातीशी धरले आहे. शिंदे कधी एखाद्या तीर्थस्थानी असतात तर अनेकदा दिल्लीचरणी. आता ते मन रमविण्यासाठी स्वतःला भाजपच्या प्रचारात गुंतवून घेत आहेत.

नकली आणि डुप्लिकेट शिवसेनेच्या प्रचारात राम उरला नाही हे त्यांना वर्षभरात समजले हे बरे झाले. महाराष्ट्राचे ‘अल्लाबक्ष’ भाजपच्या प्रचारास निघाले आहेत. त्यांची ‘आखरी मंजिल’ तीच आहे, असं आजच्या सामना अग्रलेखात (Sanjay Raut) म्हटल आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही