Nitesh Rane | संजय राऊतांच्या अंतर्वस्त्रांवर नेमका कुणाचा बिल्ला? नितेश राणेंचा खोचक सवाल

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह संपूर्ण शिंदे गट आगामी लोकसभा निवडणुकानंतर भारतीय जनता पक्षामध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर  शाब्दिक हल्लाबोल चढवला होता.

एकनाथ शिंदे यांच्या अंतर्वस्त्रावर कमळ आहे, असं संजय राऊत यांनी म्हटल आहे. त्यांच्या या टीकेला भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उत्तर दिलं आहे.

संजय राऊतांच्या अंतर्वस्त्रांवर नेमका कुणाचा बिल्ला? असा खोचक सवाल नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उपस्थित केला आहे.

नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल असं बोलताना संजय राऊत यांना लाज वाटली नाही का?

संजय राऊतांच्या अंतर्वस्त्रांवर नेमका कुणाचा बिल्ला? त्यावर नक्की कुणाचं चिन्ह आहे? त्याच्यावर मशाल आहे? की घड्याळ आहे? की हाताचा पंजा लागला आहे?”

Slaves have no opinion and no self-respect – Sanjay Raut

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या भारतीय जनता पक्षामध्येच आहे.

तुम्ही जर एकनाथ शिंदे यांचं अंतर्वस्त्र पाहिलं तर त्यावर तुम्हाला कमळ चिन्ह दिसेल. ते आत्तापासूनच भाजपमध्ये सामील झाले आहे.

कारण त्याच्याशिवाय ते मंत्री किंवा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. ते आतापासूनच भारतीय जनता पक्षाचे गुलाम झाले आहेत. गुलामांना स्वतःचं मत आणि स्वाभिमान नसतो.”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe