Chandrashekhar Bawankule | आम्ही शरद पवारांचा दाखला व्हायरल केला नाही – चंद्रशेखर बावनकुळे

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतला असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.

एवढेच नाही तर शरद पवार यांचा कथित जातीचा दाखला व्हायरल होतं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही शरद पवारांचा दाखला व्हायरल केला नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी म्हटलं आहे.

It is not appropriate to do politics during Diwali – Chandrashekhar Bawankule

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “दिवाळीच्या वेळी राजकारण करणे योग्य नाही. आम्हाला (Chandrashekhar Bawankule) लोकांमध्ये जाऊन दिवाळी साजरी करायची आहे.

ज्यांच्याकडे अंधार आहे, त्यांना उजेडात आणावे, यासाठी भाजपचे सर्व आमदार-खासदार पालावरती जाऊन दिवाळी साजरी करत आहे. यासाठी मी (Chandrashekhar Bawankule) स्वतः सासेगाव येथील गोपाळ वस्तीवर गेलो होतो.

माझ्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आज पालावरती दिवाळी साजरी करण्यासाठी गेले आहेत. अशात शरद पवार यांचा दाखला आम्ही का व्हायरल करू? त्यांचा हा दाखला कोणी व्हायरल केला, याबाबत आम्हाला काहीच माहित नाही.”

दरम्यान, या प्रकरणावर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक शरद पवारांबद्दल गैरसमज पसरवून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे.

शरद पवारांचं ओबीसी सर्टिफिकेट सोशल मीडियावर व्हायरल केलं जात आहे. राज्यातील मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रयत्न आहे.

शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रावर शरद पवारांचा मराठा असा उल्लेख आहे. त्यामध्ये बदल करून कोणीही काहीही दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe