Dhangar Reservation | गोविंद बागेत शरद पवारांच्या भेटीसाठी येणाऱ्यांना अडवणार; धनगर समाजाचा इशारा

Dhangar Reservation | पुणे: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करत असताना धनगर समाज देखील आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाला आहे.

याच पार्श्वभूमीवर धनगर समाजाचे नेते चंद्रकांत वाघमोडे उपोषणाला (Dhangar Reservation) बसले आहेत. चंद्रकांत वाघमोडे यांच्या समर्थकांनी शरद पवार गटाला इशारा दिला आहे.

गोविंद बागेत शरद पवारांच्या भेटीसाठी येणाऱ्यांना अडवणार, असा इशारा धनगर आंदोलकांनी (Dhangar Reservation) दिला आहे. या सर्व घडामोडीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी उपोषण स्थळी जाऊन आंदोलकांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे.

Dhangar community leader Chandrakant Waghmode is on a fast

बारामतीमध्ये धनगर समाज आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मुद्द्यावरून आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर धनगर समाजाचे नेते चंद्रकांत वाघमोडे उपोषण करत आहे.

शरद पवार यांच्या भेटीसाठी उद्या गोविंद बागेत येणाऱ्यांना आम्ही अडवणार, असा इशारा धनगर कार्यकर्त्यांनी दिला. त्यानंतर त्यांनी त्यांचं उपोषण मागे घ्यावं, यासाठी खासदार सुप्रिया सुळे उपोषण स्थळी दाखल झाल्या होत्या.

उपोषण स्थळी दाखल होताचं सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री कार्यालयात फोन करून याबाबत चर्चा केली. या मुद्द्यावर सुप्रिया सुळे यांनी श्रीकांत शिंदे यांच्याशी फोनवर चर्चा केली.

धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न श्रीकांत शिंदेंनी मुख्यमंत्री शिंदेंकडे मांडावा, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांशी बातचीत करत त्यांना आपलं आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना धनगर समाज (Dhangar Reservation) देखील या मुद्द्यावरून आक्रमक झाला आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजाने मराठ्यांनी केलेल्या मागणीला विरोध दर्शवला आहे.

महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. मराठ्यांच्या या मागणीनंतर ओबीसी समाज देखील आक्रमक झाला आहे.

तर आता धनगर समाज देखील पेटून उठला आहे. अशात या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय तोडगा काढतील? याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.