Share

Manoj Jarange | ओबीसी नेत्यांच्या दबावामुळे मराठ्यांवर गुन्हे दाखल – मनोज जरांगे

Manoj Jarange | जालना: सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली आहे.

त्यांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांसह ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ओबीसी नेत्यांच्या दबावामुळे मराठ्यांवर गुन्हे दाखल होत आहे, असं मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर ओबीसी समाज आणि मराठा समाजामध्ये पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

False cases are being filed against Marathas – Manoj Jarange

मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले, “ओबीसी नेत्यांनी दबाव टाकल्यामुळे मराठ्यांवर खोटे गुन्हे दाखल होत आहे. हिंगोली, सोलापूर, नांदेड इत्यादी जिल्ह्यांमध्ये त्यांच्याच लोकांनी मराठ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले आहे.

तुम्ही कितीही खोटे गुन्हे दाखल केले तरी आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मिळवणारच आहोत, असं माझं (Manoj Jarange) सरकारला सांगणं आहे.

ओबीसी नेते मराठ्यांना विरोध करत आहे. विधानसभा विरोधी पक्षनेता या संविधानिक पदावर बसलेला माणूस देखील मराठा समाजाच्या विरोधात बोलत आहे.

त्यामुळे राज्यातील वातावरण कोण बिघडवत आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला दिसत आहे. मराठा समाजासाठी सुरू असलेलं आमचं हे आंदोलन अत्यंत शांततेत सुरू आहे.”

दरम्यान, मनोज जरांगे (Manoj Jarange) गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी धडपड करत आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी उपोषण देखील केलं होतं.

राज्य सरकारने केलेल्या विनंतीवरून त्यांनी त्यांचं उपोषण मागे घेत सरकारला या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे.

सरकारने जरांगे (Manoj Jarange) यांना या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी 2 जानेवारीपर्यंत मुदत मागितली होती. मात्र त्यांनी सरकारला 02 जानेवारीपर्यंत मुदत न देता 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिला आहे.

या कालावधीमध्ये सरकार मराठ्यांना आरक्षण देईल, असा विश्वास मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

Manoj Jarange | जालना: सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now