Share

Bacchu Kadu | सत्तेत असताना विजय वडेट्टीवार ओबीसींसाठी एक सुद्धा मोठा निर्णय घेऊ शकले नाही – बच्चू कडू

Bacchu Kadu | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी धडपड करत आहे. राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. मराठा समाजाच्या या मागणीला ओबीसी नेत्यांसह ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. यामध्ये छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) … Read more

Published On: 

Bacchu Kadu | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी धडपड करत आहे. राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे.

मराठा समाजाच्या या मागणीला ओबीसी नेत्यांसह ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. यामध्ये छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांचा समावेश आहे.

याच पार्श्वभूमीवर प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे.

सत्तेत असताना विजय वडेट्टीवार ओबीसींसाठी एक सुद्धा मोठा निर्णय घेऊ शकले नाही, असं म्हणतं बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली आहे.

Bacchu Kadu commented on Vijay Wadettivar

प्रसार माध्यमांशी बोलत असताना बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले, “कुणबी असून ओबीसीत घेऊ नका, असं म्हणण्याचं धाडस कुणी करत असेल तर तर त्यांच्या विरोधात बाकीच्यांनी एकत्र यायला हवं.

सध्या जे ओबीसीबद्दल बोलत आहे, ते 50 वर्ष सत्तेत होते. त्या 50 वर्षांमध्ये त्यांनी ओबीसींसाठी काही केलं नाही. विजय वडेट्टीवार एकेकाळी ओबीसींचे मंत्री होते. त्यावेळी ते ओबीसींसाठी एखादा मोठा निर्णय किंवा एखादा मोठा निधी उभा करू शकले नाही.”

Manoj Jarange commented on Vijay Wadettivar

दरम्यान, या मुद्द्यावरून बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यासह मराठा आंदोलक  मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी देखील विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली आहे.

ते म्हणाले, “ओबीसी नेते दबाव टाकत असल्यामुळे मराठा समाजातील तरुणांवर खोटे गुन्हे दाखल होत आहे. नांदेड, सोलापूर, हिंगोली इत्यादी जिल्ह्यांमध्ये त्यांच्याच लोकांनी मराठ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले आहे.

ओबीसी नेते मराठा समाजाला विरोध करत आहे. त्याचबरोबर विधानसभा विरोधी पक्षनेता या संविधानिक पदावर बसलेला माणूस मराठा समाजाच्या विरोधात बोलत आहे.

त्यामुळे राज्याचं वातावरण कोण बिघडवत आहे? हे सगळ्यांना दिसत आहे. त्यांनी आमच्यावर कितीही खोटे गुन्हे दाखल केले तरी आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मिळवणारच आहोत.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही