Raisins Benefits | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरण सातत्याने बदलताना दिसत आहे. कुठे थंडीचा कडाका वाढला आहे तर कुठे पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
बदलत्या हवामानात आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेल्या मनुकांचे सेवन करू शकतात. रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेले मनुके सकाळी रिकामी पोटी खाल्ल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात..
रक्तदाब नियंत्रणात राहतो (Blood pressure remains under control-Raisins Benefits)
मनुकांमध्ये डायट्री फायबर आढळून येते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. त्याचबरोबर यामध्ये आढळणारे पोटॅशियम उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो.
त्यामुळे रात्री पाण्यात भिजवलेल्या मनुकांचे सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
पचनसंस्था निरोगी राहते (Digestive system remains healthy-Raisins Benefits)
पचनाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी भिजलेल्या मनुकांचे सेवन करू शकतात. यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, जे पचनास मदत करते.
त्याचबरोबर भिजवलेल्या मनुकांचे सेवन केल्याने आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. नियमित सकाळी भिजवलेल्या मनुकांचे सेवन केल्याने तुम्ही ऍसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठता इत्यादी समस्यांपासून दूर राहू शकतात.
कोलेस्ट्रॉल कमी होते (Cholesterol is reduced-Raisins Benefits)
रात्रभर पाण्यात भिजवलेले मनुके सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य निरोगी राहू शकते. नियमित याचे सेवन केल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते.
त्याचबरोबर नियमित भिजवलेल्या मनुकांचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
It has rained in the state
दरम्यान, राज्यात एकीकडे गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे, तर दुसरीकडे अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. राज्यात पुणे, ठाणे, मुंबई, पालघर, सांगली, कोल्हापूर, सातारा इत्यादी जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली.
अशात या बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात भिजवलेल्या मनुकांचा समावेश करू शकतात. नियमित याचे सेवन केल्याने बदलत्या हवामानात तुम्ही निरोगी राहू शकतात.
महत्वाच्या बातम्या
- Rohit Pawar | अर्थमंत्र्यांच्या मंत्र्यांना निधी मिळत नाही, तर मग खरा अर्थमंत्री कोण? रोहित पवारांचा खडा सवाल
- Nitesh Rane | राज्यात नवा ज्योतिषी आलाय; नितेश राणेंनी रोहित पवारांचे कान टोचले
- Govt Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! मुंबई सीमा शुल्क आयुक्तालयात भरती प्रक्रिया सुरू
- Dhangar Reservation | गोविंद बागेत शरद पवारांच्या भेटीसाठी येणाऱ्यांना अडवणार; धनगर समाजाचा इशारा
- Manoj Jarange | ओबीसी नेत्यांच्या दबावामुळे मराठ्यांवर गुन्हे दाखल – मनोज जरांगे
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले