PM Kisan Yojana | सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळी भेट! येत्या 24 तासात पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता होणार जारी

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये सर्वत्र दिवाळी सण साजरा केला जात आहे. अशात मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीची भेट दिली आहे. पीएम किसान योजनेतील (PM Kisan Yojana) 15 व्या हप्त्याची वाट बघत असलेल्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. पुढील 24 तासात प्रधानमंत्री निधी सन्मान योजनेचा पंधरावा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवला जाणार आहे. त्यामुळे … Read more

Published On: 

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये सर्वत्र दिवाळी सण साजरा केला जात आहे. अशात मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीची भेट दिली आहे.

पीएम किसान योजनेतील (PM Kisan Yojana) 15 व्या हप्त्याची वाट बघत असलेल्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. पुढील 24 तासात प्रधानमंत्री निधी सन्मान योजनेचा पंधरावा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

Narendra Modi will release the 15th installment

देशातील शेतकरी पीएम किसान योजनेतील (PM Kisan Yojana) 15 व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे. अशात शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा संपलेली असून उद्या म्हणजेच 15 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांना या योजनेतील पंधरावा हप्ता मिळणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या या योजनेचा 15 वा हप्ता जारी करणार आहे. या योजनेच्या (PM Kisan Yojana) 15 व्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना जमिनीची पडताळणी, ई-केवायसी आणि आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य होतं.

ज्या शेतकऱ्यांनी या सर्व प्रक्रिया पूर्ण केलेल्या असतील त्यांना या योजनेतील (PM Kisan Yojana) 15 व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.

दरम्यान, देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने 24 फेब्रुवारी 2019 रोजी प्रधानमंत्री निधी सन्मान योजना (PM Kisan Yojana) सुरू केली आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये केंद्र सरकार ही रक्कम शेतकऱ्यांना देते.

या योजनेचे 14 हप्ते आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 15 नोव्हेंबर रोजी या योजनेतील पंधरावा हप्ता जारी करणार आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही