Supriya Sule | गोविंद बागेतल्या दिवाळीसाठी अजित पवार अनुउपस्थित; सुप्रिया सुळे म्हणतात…

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Supriya Sule | बारामती: देशामध्ये सर्वत्र उत्साहात आणि आनंदात दिवाळी साजरी केली जात आहे. पवार कुटुंब दरवर्षी बारामती येथील गोविंद बागेत दिवाळी पाडवा साजरा करतात.

पाडव्याच्या निमित्ताने पवार कुटुंब या ठिकाणी एकत्र येतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर यंदा अजित पवार (Ajit Pawar) या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? अशा चर्चा सुरू होत्या.

अशात अजित पवार या कार्यक्रमाला आलेले नाही. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Ajit Pawar is infected with dengue – Supriya Sule

सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “अजित पवारांना डेंग्यूची लागण झाली आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार कुठल्याच कार्यक्रमाला उपस्थित नाही.

अजित पवार यांच्यासह मला (Supriya Sule) रणजित पवार आणि इतर भाऊ आहेत. माझ्या (Supriya Sule) कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

प्रत्येक जण आपली आणि आपल्या तब्येतीची काळजी घेत असतो. अजित पवार यांच्यासह रोहित पवार देखील आज इथे आले नाही. ते त्यांच्या संघर्ष यात्रेनिमित्त बीडला आहे. त्यामुळे काही गोष्टी आपण मोठ्या मनाने स्वीकारला हव्या, असं मला (Supriya Sule) वाटतं.”

यावेळी बोलत असताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी जनतेला दिवाळीच्या आणि पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्या म्हणाल्या, “महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला आज मी पाडव्याच्या आणि दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देते.

येणारं वर्ष सगळ्यांसाठी आनंदाचं आणि समृद्धीचं जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. राज्यावर सध्या दुष्काळ, बेरोजगारी, महागाईचं संकट ओढवलं आहे. या संकटातून आपली सुटका होवो, हीच देवाचरणी प्रार्थना.”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe