Rohit Pawar | जयंत पाटील यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या ‘त्या’ विधानावर रोहित पवार म्हणाले…

Rohit Pawar | सातारा : महाराष्ट्र राज्यात राजकारणातील सर्वात मोठी खळबळ आणि आजही चर्चा होत असलेली घटना म्हणून 23 नोव्हेंबर 2019 च्या पहाटे राजभवनावर झालेला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या शपथविधीकडे पाहिल जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी याबाबत मोठा दावा केला आहे.

‘देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा तो शपथविधी ही शरद पवारांची खेळी असू शकते’, असे वक्तव्य जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाष्य केलं आहे.

ते म्हणाले, “जयंत पाटील हे अधून-मधून वेगवेगळ्या प्रकारची विधानं करत असतात. त्याला वेगवेगळे अर्थ असतात. मात्र, त्या शपथविधीच्या वेळी नेमकं काय घडलं? हे अजित पवार यांनाच माहिती आहे. ते दोघंही याच्यावर काहीही बोलत नाही. त्यामुळे ही नेमकी कोणाची खेळी होती? हे आजतरी सांगता येणार नाही.”

जयंत पाटलांचं वक्त्यव्य काय?

“मला वाटत नाही की अजित पवार काही बोलले असतील. पण राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठवण्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने केलेली ही एक खेळी असू शकते. त्यामुळे मला वाटत नाही की त्याला यापेक्षा जास्त काही महत्त्व आहे”, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.