Ashish Shelar |“सुप्रिया सुळेंनी गजनी चित्रपट पुन्हा पाहावा”; आशिष शेलार असं का म्हणाले?

Ashish Shelar | मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर आणि मागील सरकारवर गंभीर आरोप केले. “महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता”, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

फडणवीसांचे हे आरोप फेटाळत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीस आपसे ये उम्मीद न थी. राज्यात गुन्हेगारी वाढत आहे. यावर काही न बोलत त्यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले याचे मला आश्चर्य वाटत आहे.” या प्रकरणावर भाष्य करत आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सुप्रिया सुळे यांना गजनी चित्रपट पुन्हा पाहण्याचा सल्ला दिला आहे.

ते म्हणाले, “सुप्रियाताईंनी पुन्हा एकदा गजनी सिनेमा पाहावा अशी माझी इच्छा आहे. कारण त्या सिनेमात शॉर्ट मेमरीचा आजार असल्याचं दाखवलंय. ताईंना असा आजार होऊ नये अशी माझी इच्छा आहे. कारण त्यांची वक्तव्य त्याच पद्धतीची दिसतायत. मी पूर्ण यादी वाचून दाखवेन ताईंना. सूडाच्या राजकारणाची भूमिका टोकापर्यंत नेणारं सरकार म्हणजे उद्धव ठाकरेंचं शरद पवार आणि काँग्रेसच्या समर्थनाचं सरकार होतं.”

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?

देवेंद्र फडणवीस यांचे विधान हे हास्यास्पद असल्याचं त्या म्हणाल्या. “दिलीप वळसे पाटील हे त्यांच्या विधानावर सविस्तर बोलले आहेत. अशा खोट्या नाट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा पुण्यात कोयता गॅंग, धायरीत गोळीबार झाला अशा घटना घडत आहेत. राज्याचे गृहमंत्री म्हणून त्यांनी यावर बोलणे अपेक्षित होते. त्यांना विनम्र विनंती आहे की, पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सगळीकडे गुन्हेगारी वाढत आहे. नागरिकांची सुरक्षा करणे याला त्यांनी प्राधान्य दिले पाहिजे”, असे सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हंटल होतं.

देवेंद्र फडणवीसांचे आरोप काय?

“महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता. महाविकास आघाडीमध्ये संजय पांडे यांना टार्गेट देण्यात आलं होतं. मात्र माझ्या विरोधात त्यांना काहीही सापडलं नाही. मी काहीही केलं नव्हतं त्यामुळे मला संजय पांडे अडकवू शकले नाहीत. मला तुरुंगात टाकण्याचे कुठलेही प्रयत्न सफल झाले नाहीत.”

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.