BJP | “उद्धव ठाकरे वंचितमध्ये प्रवेश करणार आहेत का?”; भाजपच्या ‘या’ नेत्याचा सवाल 

BJP | अमरावती :  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedakr) यांनी २३ जानेवारी रोजी युतीची घोषणा केली. अनेकांनी या युतीवरुन टीका केली आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी यावर भाष्य केलं आहे.

त्या म्हणाल्या, “महाराष्ट्रातील राजकारण कल्पनेच्या पलीकडं चाललं आहे. त्यांनी युती कोणासोबत केली आहे? त्यांच्यासोबत जे घरातून कधी बाहेर निघत नाहीत. प्रकाश आंबेडकर यांना उद्धव ठाकरे यांच्यासमोरचं काय चित्र दिसत आहे. उद्धव ठाकरे वंचितसोबत जाऊन एक पक्ष स्थापन करणार आहेत का? की वंचितमध्ये उद्धव ठाकरे प्रवेश करणार आहेत? कारण सध्याचं राजकारण पाहता येणाऱ्या काळात काहीही होऊ शकतं.”

उद्धव ठाकरे यांना स्वतःवर विश्वास नाही असं म्हणत नवनीत रांना यांनी टोला लगावला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्याच्या खर्चावरून माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चार्टड फ्लाईटने आले. त्यावरही आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेतला. यावरही नवनीत राणा याबाबतही खोचक प्रतिक्रिया दिलीय.

“सोन्याचं ताट घेऊन ज्यांनी आपल्या जीवनाची सुरुवात केली त्यांना ग्राऊंड लेव्हल ला काय कष्ट करावे लागतात हे समजणार नाही”, असं म्हणत नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आदित्य ठाकरे यांना सुनावलं आहे.

महत्वाच्या बातम्या :