Eknath Shinde | “लोकशाहीत प्रत्येकाला…”; उद्धव ठाकरेंच्या ठाणे दौऱ्यावरुन मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Eknath Shinde | मुंबई : आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज ठाणे दौऱ्यावर आहेत. यावेळी पक्षाच्यावतीने आयोजित महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच ठाणे शहरातील पक्षाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘वर्षा’ निवासस्थानी पार पडलेल्या ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापल्या पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार आहे. त्यामुळें ते जात असतील तर हरकत नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच आज अनेक ठिकाणी पालकमंत्री नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी होईल? असं विचारलं असता, “लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल”, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जुन्या पेंशनचा मुद्दा गाजतो आहे. याबाबत सरकार सकारात्मक असून अभ्यास करून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

‘शरद पवार मोठे नेते आहेत आणि प्रकाश आंबेडकर देखील आमचे स्नेही आहे त्यामुळे त्यांच्या बाबत मी काय बोलणार’, असेही मुख्यमंत्री एकनाथ म्हणाले आहेत. तत्पूर्वी 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘वर्षा’ या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजारोहण करून ध्वजवंदन केले. यावेळी त्यांनी प्रजासत्ताक दिनीनिमित्त ‘वर्षा’ बंगल्यावर कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवाना, तसेच राज्यातील जनतेलाही शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या