Prakash Ambedkar | “आमची युती ठाकरेंशी, महाविकास आघाडीशी…”; प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने खळबळ

Prakash Ambedkar | पुणे : दोनच दिवसांपूर्वी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) यांची राजकीय युती झाली. या युतीनंतर पुन्हा राजकीय क्षेत्रात भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित होऊ लागले. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग असणार का? हा सवाल उपस्थित केला जात होता. यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठं विधान केलं आहे.

“आमची युती ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीचा काहीच संबंध नाही”, असं स्पष्ट विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या एकत्र येण्याने महाविकास आघाडीची ताकद आणखी वाढल्याचा दावा केला जातोय. पण दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्याला महाविकास आघाडीत जायचंच नाही, असं विधान केलं आहे.

“मी महाविकास आघाडीचा भाग झालो नाही. आणि माझी इच्छाही नाही”, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिलीय. ठाकरे गटाशी आमची युती झाली आहे. सरकार पडण्याआधी काँग्रेस, राष्ट्रवादी , शिवसेना एकत्र होती. नाना पटोलेंनी वक्तव्य केलं की आम्ही स्वतंत्र जाणार आहोत. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादी प्रतिसाद देत नसल्याचं देखील ते यावेळी बोलताना म्हणाले.

“आमची युती ही ठाकरेंबरोबर आहे. आमचा आणि महाविकास आघाडीचा काही संबंध नाही. मी कोणाचीच प्रतिक्षा करत नाही. आम्ही जाहीर केलंय 2024 च्या निवडणूका आम्ही एकत्र लढणार. मैत्री करायची तर प्रामाणिक करायची. प्रामाणिकता नसेल तर समझौता करायचा नाही”, असंदेखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Back to top button