Shivsena | “तुम्ही वडिलांसाठी काय केलं, अन् आम्ही…”; शिंदे गटातील ‘या’ नेत्याचा ठाकरेंवर हल्लाबोल

Shivsena | बुलढाणाः राज्यातील राजकीय वातावरण सध्या तापलेलं आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरून चाललेल्या न्यायालयीन संघर्षांमुळे शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये कलगीतुरा रंगला आहे. त्यात भर म्हणजे निवडणुकांच्या पोस्टरवरुनही जोरदार खडाजंगी चालू असल्याचे दिसून येत आहे.

सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड पुकारलं. शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन केलं. त्यामुळे त्यांच्यावर वारंवार बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरला जात असल्याने प्रचंड टीका केली जात आहे .

उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी हल्ली लोकं दुसऱ्यांचे वडिलही चोरतात असा टोला शिंदे गटाला लगावला होता. यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे गटाला सुनावलं आहे. ते म्हणाले, “देशाचा महापुरुष हा कोण्या एकट्याच नसतो. त्यामुळे कोणी कितीही ओरडले तरी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आमचाच हक्क आहे. कारण त्यांनी सांगितलेल्या हिंदुत्वासाठीच आम्ही त्यांच्या विचाराने घालून दिलेल्या वाटेवरून चालत आहोत.”

“आपण आपल्या वडिलांसाठी काय केले, आणि आमच्यासारख्य लोकांनी किती रक्त सांडले हे त्यांनी एकदा पाहावे. शिंदे गटातील हे मावळे सोबत होते, म्हणून बाळासाहेबांचे विचार देशभर पोहचले आहेत”, असं म्हणत संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :