Nilesh Rane | “आदित्य ठाकरेंनी मंत्री असताना दावोस दौऱ्यानंतर लंडनमध्ये…”; निलेश राणेंचं ‘ते’ ट्विट चर्चेत

Nilesh Rane | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दावोस दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्याच्या खर्चावरून माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चार्टड फ्लाईटने आले. त्यावरही आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे.

अशातच भाजपा नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना खोचक शब्दांत लक्ष्य केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर निलेश राणेंनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे.

“आदित्य ठाकरेंनी जाहीर करावं की मंत्री असताना दावोस दौऱ्यानंतर त्यांनी लंडनमध्ये १० दिवस घालवले की नाही? लंडनमध्ये असताना आदित्य ठाकरेंनी कुठलं शासकीय काम हाताळलं?”, असा सवाल निलेश राणेंनी केला आहे.

 

आदित्य ठाकरेंचं वक्तव्य काय?

“मुख्यमंत्री 16 तारखेला ते दावोसला पोहोचले. ज्या महत्त्वाच्या बैठका होत्या त्या रद्द झाल्या. एमआयडीसीचे सीईओ गेले होते का? अधिकृत कोण गेलं होतं? सगळा खर्च कसा झाला हे सगळ्यांसमोर यायला हवं. 17 तारखेला डावोसमध्ये तिथलं जे काँग्रेस आहे तिकडे बोलायला स्लॉट मिळाला. शाश्वत विकासावर त्यांनी भाषण केलं. मुंबईचा जोशी मठ करायला निघालेले मुख्यमंत्री काय बोलले असतील? जे मुख्यमंत्री चार्टर घेऊन जातात त्यांनी वेळेत पोहोचायला हवं,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

महत्वाच्या बातम्या :