Skin Care Tips | चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Skin Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: स्त्रिया सेवा पुरुष प्रत्येकाला चमकदार (Glowing) आणि निरोगी (Healthy) त्वचा हवी असते. त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत असतो. यासाठी लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेले महागडे क्रीम आणि लोशन वापरतात. मात्र, या केमिकलयुक्त उत्पादनांचा चेहऱ्यावर अनेकदा दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी नेहमी नैसर्गिक पद्धतींचा अवलंब केला पाहिजे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही फळांचा समावेश करू शकतात. या फळांचे नियमित सेवन केल्याने चेहऱ्यावरील समस्या तर दूर होतातच, पण त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते. चेहऱ्याची निगा राखण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आहारात पुढील फळांचा समावेश करा.

डाळिंब

डाळिंब आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने त्वचेवरील सुरकुत्यांची समस्या सहज दूर होऊ शकते. त्याचबरोबर त्वचेवरील चमक वाढते. डाळिंबामध्ये माफक प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे चेहऱ्यावरील डाग कमी करण्यास मदत करते.

किवी

किवी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. किवीमध्ये माफक प्रमाणात विटामिन ई आढळून येते, जे त्वचेवरील काळे डाग काढून त्वचा चमकदार बनवण्यास मदत करते. किवीचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत होते.

पेरू

पेरू आपल्या त्वचेसाठी उपयुक्त ठरू शकतो. पेरूमध्ये पोटॅशियम, फोलेट आणि विटामिन सी भरपूर प्रमाणात आढळून येते. त्यामुळे नियमित पेरूचे सेवन केल्याने त्वचेवरील घाण साफ होऊन चेहरा स्वच्छ होण्यास मदत होते. नियमित पेरूचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील चमक वाढते.

त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी वरील फळांची सेवन करणे उपयुक्त ठरू शकते. मात्र, तुम्हाला कोणता आजार किंवा ॲलर्जीची समस्या असल्यास डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घेऊन या फळांचे सेवन करा. त्याचबरोबर वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या