Mohommad Siraj | मोहम्मद सिराजने सर्वांना टाकलं मागं, ICC रँकिंगमध्ये पोहोचला पहिल्या क्रमांकावर

Mohommad Siraj | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याला त्याच्या या कामगिरीचा फायदा वनडे क्रमवारीत झाला आहे. या कामगिरीनंतर मोहम्मद सिराज जगातील अव्वल गोलंदाज ठरला आहे. मोहम्मद सिराज फेब्रुवारी 2022 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये परतला होता. त्याने एका वर्षात जबरदस्त कामगिरी करत अव्वल स्थान गाठले आहे.

मोहम्मद सिराजने फेब्रुवारी 2022 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. त्यानंतर त्याने टीम इंडियासाठी वीस सामन्यांमध्ये 37 विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर तो आयसीसी गोलंदाजी क्रमवारीत नंबर-1 वर पोहोचला आहे. याआधी मोहम्मद सिरजला आयसीसी वनडे टीम ऑफ द इयरमध्ये स्थान मिळाले आहे.

श्रीलंकेविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये मोहम्मद सिराजने तब्बल नऊ विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर न्युझीलँडविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने चार विकेट आपल्या नावावर केल्या होत्या. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये तो फक्त एक विकेट घेऊ शकला होता. अशाप्रकारे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्यांनी पाच विकेट घेतल्या होत्या.

आयसीसी एकदिवसीय क्रमवारीमध्ये मोहम्मद सिराजकडे 729 रेटिंग गुण आहे. या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर जोश हेझलवूड 727 रेटिंगसह आहे. तर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंट बोल्ट 707 रेटिंग गुणांसह आहे. मोहम्मद सिराजशिवाय या यादीमध्ये कोणताही भारतीय गोलंदाज टॉप-10 मध्ये नाही. या यादीमध्ये जसप्रीत बुमराहचे नाव 24 व्या क्रमांकावर आहे. तर कुलदीप यादव 20 व्या क्रमांकावर आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.